सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करणारा उमरान मलिक आयपीएल २०२२मध्ये जबरदस्त गोलंदाजी करत आहे. जम्मू काश्मीरच्या या २२ वर्षीय खेळाडूने चालू हंगामात आतापर्यंतच्या सामन्यात ज्या पद्धतीचे प्रदर्शन केले आहे, ते पाहून सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. अशात आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली देखील उमरानच्या प्रदर्शनामुळे चांगलेच प्रभावित झाल्याचे दिसत आहे.
उमरान मलिक (Umran Malik) चालू आयपीएल हंगामात ताशी १४० ते १५० किमीच्या गतीने गोलंदाजी करताना दिसला आहे. या गतीसह उमरान अगदी सहजतेने गोलंदाजी करत आहे. अनेकजण त्याला भारतीय संघाचा भविष्यातील महत्वाचा गोलंदाज मानू लागले आहेत. उमरानने या हंगामात अनेकदा ताशी १५० पेक्षा अधिकच्या वेगानेही गोलंदाजी केली. या जबरदस्त प्रदर्शनानंतर तो पर्पल कॅपच्या शर्यतीत सहभागी झाला आहे, जी सध्या फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलकडे आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आयपीएल २०२२मध्ये (IPL 2022) खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असल्याचे पाहायला मिळाले आहे, पण यादरम्यान अनेक गोलंदाज असे ठरले आहेत, ज्यांनी मागच्या हंगामाच्या तुलनेत यावर्षी चांगले प्रदर्शन केले आहे. उमरानप्रमाणेच अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि खलील अहमद यांचेही प्रदर्शन कौतुकास पात्र ठरले आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि सध्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सौरव गांगुलीनेही (Saurav Ganguly) या खेळाडूंचे कौतुक केले आहे.
खेळाडूंचे कौतुक करताना गांगुली म्हणाला की, “हे खूप रोमांचक राहिले आहे. मी पाहतोय की, कोणताही संघ जिंकू शकतो आणि इथे प्रत्येकजण चांगला खेळतोय. दोन नवीन संघ गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स चांगले प्रदर्शन करत आहेत. उमरान मलिकची गोलंदाजी छाप सोडणारी राहिली आहे. उमेश यादवने आहे आणि खलील अहमदने देखील चांगले प्रदर्शन केले आहे. मी म्हणेल की, उमरान मलिक आतापर्यंत लीगचा उत्कृष्ट चेहरा राहिला आहे.”
दरम्यान, आयपीएलच्या चालू हंगामात दरवर्षीप्रमाणे काही नवीन आणि काही जुन्या खेळाडूंनी चमक दाखवली आहे. यामध्ये इंग्लंडचा सलामीवीर जोस बटलर, फिरकीपटू युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, उमेश यादव, राहुल तेवतिया, दिनेश कार्तिक, केएल राहुल, या अशा काही नावांचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL | ‘हे’ ३ खेळाडू चालवणार धोनीची जागा? बनू शकतात चेन्नईचे भविष्यातील कर्णधार
झेलबाद झाला गिल, परंतु डीआरएसमध्ये निघाला नो बॉल; नाट्यमय प्रसंगामुळे पंचांवर चिडला विराट