नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीला भारतीय क्रिकेट संघाला नवीन सुरूवात करून देण्याचे श्रेय जाते. जेव्हा मॅच फिक्सिंगमध्ये भारतीय क्रिकेट गुंतला होता, तेव्हा त्याने संघाची जबाबदारी हाती घेतली होती.
गांगुलीने (Sourav Ganguly) संघावर चांगलं नियंत्रण ठेवलं होतं. त्याने असे खेळाडू तयार केले, जे सामना विजेते होऊ शकतील. अशाप्रकारे एका यशस्वी संघाबरोबर त्याने वारसा पुढे चालू ठेवला.
त्याने विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, हरभजन सिंग, झहीर खान आणि आशिष नेहरा अशा खेळाडूंची ओळख पटवून दिली. जे एमएस धोनीच्या नेतृत्वात २०११ मध्ये विश्वचषक विजेत्या संघाचे हिरो बनले होते.
गांगुली म्हणाला, अशा खेळाडूंना पाठिंबा द्यायला हवा जे स्वत: सामना विजेते होतील. एक कर्णधार आणि नेता म्हणून त्यांचा सर्वात मोठा वारसा होता. त्यांच्यात मायदेशात आणि मायदेशाबाहेर दोन्ही ठिकाणी सामने जिंकण्याची क्षमता होती. आणि त्यामुळे त्यांचा अभिमान वाटतो.
त्याच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या खेळाडूंपैकी २०११ विश्वचषक विजेत्या संघात सात ते आठ खेळाडू होते. सेहवाग, धोनी, युवराज, झहीर, हरभजन, नेहरा यांसारखे दिग्गज खेळाडू होते. मला वाटतं हा एक वारसा आहे, आणि मला कर्णधार म्हणून तो सोडण्यात खूप आनंद झाला होता. आणि हा माझा सर्वात मोठा वारसा आहे, की मी असा एक संघ तयार केला. त्यांच्यात देशात आणि देशाबाहेर जाऊन सामना जिंकण्याची क्षमता होती,” असे अनअकॅडमी बरोबर ऑनलाईन लेक्चर मध्ये गांगुली म्हणाला.
गांगुलीच्या नेतृत्वात सेहवाग, युवराज, हरभजन, झहीर, नेहरा, धोनी यांसारख्या प्रतिभावान खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याला भारताच्या सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक मानले जातो. त्याने संघाची परदेशात खेळण्याची पद्धतही बदलली होती.
२०११ मधील विश्वचषक उंचावताना एमएस धोनीला पाहून त्याला अभिमान वाटला. त्याने २००३ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या आठवणी परत जागवल्या. जेव्हा भारत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता.
“मला आठवते, की त्या रात्री मी वानखेडे स्टेडियमवर होतो. आणि मी कॉमेंट्री बॉक्समधून खाली धोनी आणि संघाला पाहण्यासाठी मैदानात आलो होतो. २००३ मध्ये मी ज्या संघाचा कर्णधार होतो. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पहिला होता. धोनीला ही ट्रॉफी जिंकण्याची संधी मिळाली. हे पाहून मला फार आनंद झाला होता,” असेही तो पुढे म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-वेस्ट इंडीजचा ‘द्रविड’ म्हणून ओळख असलेला चंद्रपाॅल डोळ्याखाली का लावायचा काळी पट्टी?
-धक्कादायक! १९ वर्षांखालील महिला क्रिकेटपटूने केली आत्महत्या
-बीसीसीआय आयसीसीतील तणाव वाढला! टी२० विश्वचषकावरुन सुरु झालेत वाद