भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू व मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या मागील जवळपास चार वर्षांपासून कसोटी संघाचा भाग नाही. नुकत्याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेवेळी त्याने सध्या कसोटी संघात परतण्याचा कोणताही मनोदय नसल्याचे म्हटलेले. आता याच मुद्द्यावर भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेवेळी बोलताना त्याने कसोटी संघात परतण्याचा विचार नसल्याचे म्हटले होते. मी कसोटी संघात येण्यासाठी कोणतीही भरीव कामगिरी केली नसल्यामुळे मला आयती संधी नको अशी कबुली त्याने दिलेली. असे असताना सौरव गांगुली यांनी त्याने कसोटी क्रिकेट खेळायला हवे असे म्हटले.
गांगुली म्हणाले,
“हार्दिक टी20 स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जातो. मात्र, माझी इच्छा आहे की त्याने कसोटी क्रिकेट देखील खेळायला हवे. तो भारतीय संघाला हवा आहे. त्याने कसोटी संघात पुनरागमन केल्यास त्याला त्याच्या याच खेळासाठी ओळखले जाईल. मर्यादित षटकांच्या संघात खेळत असला तरी तो एक खास क्रिकेटर आहे.”
हार्दिक मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा उपकर्णधार असला तरी, मागील जवळपास चार वर्षांपासून तो कसोटी संघाचा भाग नाही. 2018 इंग्लंड दौऱ्यावर त्याने आपला अखेरचा कसोटी सामना खेळला होता. हार्दिकच्या कसोटी कारकिर्दीचा विचार केल्यास, 11 कसोटीत त्याने 32 च्या सरासरीने 532 धावा केल्या आहेत. त्याबरोबर त्याच्या नावे 17 बळी देखील जमा आहेत. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात हार्दिकने खेळायला हवे असे अनेकांनी म्हटले होते. मात्र, इतर खेळाडूंचा हक्क घेऊन आपल्याला खेळायचे नाही असे त्याने म्हटले.
(Sourav Ganguly Said Hardik Pandya Must Play Test Cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“आता मी 10 पट चांगला गोलंदाज बनलोय”, युवा गोलंदाजाने व्यक्त केली पुनरागमनाची आशा
अशी असावी अर्धांगिनी! धोनीला कर्णधारपदावरून काढल्यानंतर साक्षीने घेतलेला संघमालकाशी पंगा