Thursday, March 30, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शक्यच नाही! दिग्गजाने खोडून काढली ऑस्ट्रेलियाच्या पुनरागमनाची शक्यता, म्हणाला, “भारत 4-0 ने जिंकणार”

February 26, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Team-India

Photo Courtesy: Twitter/BCCI


होळकर क्रिकेट स्टेडिअम, इंदोर येथे 1 मार्चपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023मध्ये पाहुण्या संघाला नमवत भारताने 2-0 ने मालिकेत आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील या उर्वरित दोन सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ पुनरागमन करणार अशी अनेकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ऑस्ट्रेलिया या मालिकेत पुनरागमन करणे अवघड असल्याचे म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियन संघ मोठ्या कालावधीनंतर भारतात मालिका विजय मिळवण्याच्या इराद्याने या मालिकेत सहभागी झाला होता. अनेक माजी क्रिकेटपटूंनी ऑस्ट्रेलियालाच या मालिकेत विजयाची संधी असल्याचे म्हटलेले. मात्र, प्रत्यक्ष सामन्यावेळी ऑस्ट्रेलियन संघ भारतापेक्षा दुबळा दिसून आला. भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाच्या सर्वच फलंदाजांनी अक्षरशः नाग्या टाकल्या. नागपूर व दिल्ली येथे झालेल्या पहिल्या दोन्ही कसोटी भारतीय संघाने तीन दिवसात जिंकत बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आपल्याकडे राखण्यात यश मिळवले.

ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत पुनरागमन करणार का असा प्रश्न विचारल्यानंतर सौरव गांगुली म्हणाले,

“ऑस्ट्रेलिया नक्कीच एक उत्कृष्ट संघ आहे. मात्र, प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास त्यांच्यासाठी आता मालिकेत येणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया संघ भारताला पराभूत करू शकत नाही. ज्या प्रकारच्या खेळपट्ट्या मालिकेत आहेत त्यासाठी भारताचा संघ ऑस्ट्रेलियाच्या खूपच पुढे दिसून येतो. मला भारतीय संघ ही मालिका 4-0 असा जिंकताना दिसतोय.”

नियमित कर्णधार पॅट कमिन्स मायदेशी परतला असल्याने, अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करेल. त्या व्यतिरिक्त सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा देखील मालिकेतून बाहेर झाला आहे.

(Sourav Ganguly Said India Won Border Gavaskar Trophy By 4-0)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी खेळाडूच्या वयामुळे पेटला नवीन वाद, ‘तुम्हीच सांगा कोणत्या एँगलने 16 वर्षांचा दिसतो हा खेळाडू’
‘या’ खेळाडूला दुर्लक्षित करून ऑस्ट्रेलियाने केली मोठी चूक, भारतीय दिग्गजाचा खुलासा


Next Post
Mayank Agarwal

मयंक अकरवालला मिळाले रेस्ट ऑफ इंडियाचे कर्णधारपद, सरफराज खान संघातून बाहेर

Delhi-Capitals

दिल्लीला दुहेरी धक्का! पंतच्या जागी यष्टीरक्षण करणारा खेळाडूही दुखापतग्रस्त, नुकताच गाजवलेला देशांतर्गत हंगाम

Ishant-Sharma-Ms-Dhoni

'त्या' घटनेनंतर महिनाभर रडत होता ईशांत, धोनी-शिखरने दिलेला धीर

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143