भारतीय क्रिकेटमध्ये सध्या युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याचे नाव अत्यंत चर्चेत आहे. मागील वर्षी देशांतर्गत हंगाम तसेच यावर्षी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर त्याला भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 171 धावांची लाजवाब खेळी करत सर्वांचे मन जिंकले. त्याच्या या शानदार फॉर्मचा फायदा करून घेण्यासाठी भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी त्याला विश्वचषकात खेळवण्याची मागणी केली आहे.
यशस्वी मागील वर्षभरापासून शानदार फॉर्ममध्ये दिसून आला आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्व स्पर्धांमध्ये त्याने शतके ठोकली. आयपीएलच्या सोळाव्या हंगामात त्याची बॅट चांगलीच तळपली. त्याने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक या हंगामात झळकावले. तसेच सहाशे पेक्षा जास्त धावा करून तो स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू ठरला. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय पदार्पणातही मोठी खेळी केल्यानंतर गांगुली यांनी त्याचे कौतुक केले. गांगुली म्हणाले,
“यशस्वी जयस्वाल सध्या अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. त्याने आपल्या खेळाचा दर्जा दाखवला. मी त्याला आगामी वनडे विश्वचषकात भारतीय संघात खेळताना पाहू इच्छितो. मी नेहमीच डाव्या-उजव्या सलामी जोडीच्या बाजूने आहे. अशा पद्धतीने सलामी जोडी असल्यास विरोधी संघ नेहमी दबावत असतो.”
भारतीय संघ मागील बरीच वर्षांपासून रोहित शर्मा व शिखर धवन या सलामी जोडीसह मैदानात उतरत होता. सध्या भारताच्या सलामीची जबाबदारी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्मा व शुबमन गिल सांभाळतात. तर, जयस्वाल याने देखील सलामीवीर म्हणून कसोटीत पदार्पण केले आहे.
(Sourav Ganguly Said We want See Yashasvi Jaiswal In ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या –
“त्याने पाणीपुरी विकलीच नाही”, यशस्वीच्या प्रशिक्षकांचा खळबळजनक दावा, म्हणाले, “तो माझ्यामूळे…”
देशासाठी तीन विश्वचषक जिंकणाऱ्या धोनीवर माजी कर्णधाराचा निशाणा; म्हणाले, ‘कर्णधार तोच राहणार…’