मंगळवार दि.19 जूनला इंग्लंडने ऑस्ट्रेलिया विरूद्ध विक्रमी 481 धावा करत एकदिवसीय क्रिकेट मधील आजपर्यंतची सर्वोच्च धावसंख्या उभारली.
इंग्लंडच्या या खेळीने ट्वीटरवर जास्त अॅक्टीव नसलेला भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला ट्वीट करण्यास भाग पाडले.
त्याने त्याच्या ट्वीटमधून क्रिकेटविषयी चिंता व्यक्त केली.
https://twitter.com/SGanguly99/status/1009117432361910273?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=http%3A%2F%2Fwww.timesnownews.com%2Fsports%2Fcricket%2Fcricket-news%2Farticle%2Fsourav-ganguly-says-he-is-scared-after-england-s-highest-total-in-odis-explains-why%2F242953
“50 षटकात इंग्लंडने जवळ जवळ 500 धावा केलेले बघून मला क्रिकेटविषयी चिंता वाटायला लागली आहे. क्रिकेट कोणत्या दिशेने चाललेय.लिली,थॉमसन आणि बेनॉर्ड यांची परंपरा असलेला ऑस्ट्रेलियन संघाची अशी अवस्था होत आहे. कोणत्याही परिस्थीतीत हे स्विकारण्याजोगे नाही. ” असे गांगुली त्याच्या पहिल्या ट्वीटमध्ये म्हणाला.”
https://twitter.com/SGanguly99/status/1009118065861251073?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=http%3A%2F%2Fwww.timesnownews.com%2Fsports%2Fcricket%2Fcricket-news%2Farticle%2Fsourav-ganguly-says-he-is-scared-after-england-s-highest-total-in-odis-explains-why%2F242953
पुढे एकेकाळचे सर्वोत्तम गोलंदाज मॅकग्राथ ब्रेट ली, मॅकडरमॉट आणि जेसन गिलेस्पी या माजी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची नावे घेत तो म्हणाला, “आत्ताचे ऑस्ट्रेलियन गोलंदाज अत्यंत सामान्य आहेत. क्रिकेटचे अस्तित्व कायम राहण्यासाठी चांगल्या गोलंदाजांची गरज आहे. क्रिकेट संपत आहे का? आशा नाही तर खात्री आहे, ऑस्ट्रेलियासारख्या क्रिकेटमधील बलाढ्य देशात कौशल्यपूर्ण आणि उत्तम गोलंदाज आहेत.”
McGrath ..lee ..warne played both forms of the game at the same time ..hazelwood ,starc I m sure can do the same
— Sourav Ganguly (@SGanguly99) June 19, 2018
“मॅकग्राथ, ब्रेट ली आणि शेन वार्न हे कसोटी आणि मर्यादित षटके या दोन्ही प्रकारचे सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. मला खात्री आहे की हेझलवूड आणि स्टार्कसुद्धा यांच्यासारखी कामगिरी करतील.” असे भारतीाचा माजी कर्णधार त्याच्या तिसऱ्या ट्वीटमध्ये म्हणाला.
मंगळवार दि.19 जूनला इंग्लंडने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात 242 धावांनी विजय मिळवत पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
आजच्या दिवसातील सर्वात महत्त्वाच्या बातम्या-
-४८१ धावा तर केल्या; परंतु अजून १६ धावा केल्या असत्या तर इतिहास घडला असता!
-अर्जून तेंडूलकरबद्दलची ही आहे दिवसातील सर्वात मोठी बातमी
-पृथ्वी शाॅ पुन्हा गरजला, २० चौकार आणि ३ षटकारांची आतिषबाजी
-अबब ! इंग्लंडने आॅस्ट्रेलियाला पाजले पाणी; वनडेत चोपल्या ४८१ धावा
-धावा केल्या इंग्लंडने ४८१; टेन्शन घेतलंय या भारतीय माजी कर्णधारान