भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष बनणार आहे. गांगुलीने सोमवारी बीसीसीआयच्या अध्यपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे आता गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष बनल्याची अधिकृत घोषणा 23 ऑक्टोबरला केली जाणार आहे.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कोलकताला परतल्यानंतर गांगुली म्हणाला भारतीय कर्णधार विराट कोहलीने मोठ्या स्पर्धा जिंकण्याकडे लक्ष दिले पाहिजे.
गांगुली म्हणाला, ‘भारत चांगला संघ आहे. फक्त एकच समस्या आहे, विराट कोहलीने मोठ्या स्पर्धा जिंकण्याकडे लक्ष द्यायला हवे. आपण शेवटचे 7 मोठ्या स्पर्धा जिंकू शकलेलो नाही. पण भारताने उपांत्य सामने आणि अंतिम सामने वगळता या मोठ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आशा आहे की विराट ही परिस्थिती बदलेल. तो चॅम्पियन खेळाडू आहे.’
त्याचबरोबर गांगुलीने वृद्धिमान साहाबद्दल म्हटले आहे की त्याचे यष्टीरक्षण चांगले आहे पण त्याने धावा करणेही गरजेचे आहे.