आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची महत्वाची मीटिंग येत्या काही कालावधीमध्ये निश्चित करण्यात आली आहे. या मिटींगमध्ये बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींऐवजी जय शहा सहभागी होणार आहेत. मागील काही दिवसांपूर्वीच सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते.
सौरव गांगुली यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असला तरी त्यांना तीन आठवड्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला मिळालेला आहे. गांगुली यांची प्रकृती योग्य नसल्यामुळे त्यांच्या ऐवजी जय शहा आयसीसीच्या मीटिंगमध्ये बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करतील, याची माहिती बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी दिली आहे.
अरुण धुमाळ पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “बीसीसीआयचे सचिव जय शहा आयसीसीच्या आगामी मीटिंगमध्ये बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करतील, कारण दादा ( गांगुली) नुकतेच आजारपणातून बरे झाले आहेत व त्यांना पुरेपूर विश्रांतीचा सल्ला मिळालेला आहे.”
आयसीसीच्या या मीटिंगमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या मिटिंग दरम्यानच पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासंदर्भातही चर्चा होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आजच्या खेळीने पंतच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद, ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच आशियाई यष्टीरक्षक






