भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी रॉजर बिन्नी यांची घोषणा मंगळवारी (18 ऑक्टोबर) करण्यात आली. बिन्नी यांनी 1983च्या विश्वचषकामध्ये महत्वाची भुमिका पार पाडली. यामुळे बीसीसीआयच्या इतिहासात प्रथमच एखादा विश्वविजेता क्रिकेटपटू पूर्णवेळ अध्यक्ष बनला आहे. त्यांच्याआधी माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली हे बीसीसीआयचे अध्यक्ष होते. त्यांनी बिन्नी अध्यक्ष झाल्यावर महत्वाचे विधान केले आहे.
सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी आपला कार्यकाळ संपल्यावर नियुक्त झालेल्या नवीन सदस्यांचे अभिनंदन केले आहे. गांगुली यांनी म्हटले, “मी रॉजर बिन्नी यांचे अभिनंदन करतो. जे नवीन लोक निवडले गेले, ते बाकी गोष्टींना पुढे नेतील. बीसीसीआय आता चांगल्या हातात आहे. भारतीय क्रिकेट मजबूत असून त्यांना भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा.”
गांगुली यांना पुन्हा बीसीसीआयचे अध्यक्ष व्हायचे होते, मात्र त्यावर नकार मिळाला. यामुळे त्यांनी 11 ऑक्टोबरला हे पद सोडले. त्यांनी 2019मध्ये हा पदभार स्विकारला होता. त्यांच्या या कारकिर्दीला तीन वर्ष पूर्ण झाली. याबाबत गांगुली यांनी निवडणुकीचा निकाल लागण्याआधी म्हणाले, “मी बंगालच्या क्रिकेट असोसिएशनचा (सीएबी) अध्यक्ष म्हणून पाच वर्ष काम पाहिले. त्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष झालो. एक सदस्य म्हणून चांगले घडण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. मी एक खेळाडू राहिलो आहे, याामुळे मला माहित आहे की आपण शेवटपर्यंत खेळू शकत नाही. तसेच या जबाबदाऱ्यांचे आहे. ”
गांगुली यांनी 2015 ते 2019 असे सीएबीचे अध्यक्ष राहिले. आता या अध्यक्षपदाची निवडणूक ते लढवणार आहे. त्याचा 31 ऑक्टोबरला याचा निकाल लागणार आहे. तसेच बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी एकट्या बिन्नी यांनीच अर्ज केला होता.
“गांगुली यांना आयपीएल अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली होती पण त्याने ती नम्रपणे नाकारली. त्याच संस्थेचे प्रमुख झाल्यानंतर बीसीसीआयच्या उपसमितीचे प्रमुख बनणे तो स्वीकारू शकत नाही, असा त्यांचा तर्क होता. त्यांनी या अध्यक्ष पदावर कायम राहण्यास रूची दर्शवली होती,” असे बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले.
मुंबईला झालेल्या बीसीसीआयच्या एजीएम बैठकीत बिन्नी यांची अध्यक्षपदी निवड करण्याव्यतिरिक्त राजीव शुक्ला यांची उपाध्यक्षपदी, जय शहा यांची सचिवपदी, देवजित सैकिया यांची सहसचिवपदी आणि आशिष शेलार यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंकेने आव्हान राखलं! दणदणीत विजयासह मुख्य फेरीच्या आशा कायम
संपुर्ण यादी: आजपर्यंत बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषविलेले व्यक्ती, पाच क्रिकेटरसह ‘या’ राजकारण्यांचा समावेश