भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि काही वर्ष बीसीसीआय अध्यक्षपद चांगल्या पद्धतीने निभावणाऱ्या सौरव गांगुली यांच्यासोबत एक घटना घडली आहे. सौरव गांगुली यांचा महागडा फोन चोरीला गेला आहे. माहितीनुसार हा फोन गांगुलींचा वैयक्तिक होता आणि यात अनेक महत्वाचे लॉगइन्स देखील होते. माजी क्रिकेपटूने याविषयी पोलिसात तक्रार नोंदवली आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याच्या वैयक्तिक फोनची चोरी ही मागच्या महिन्यात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताच्या सर्वोत्तम कर्णधारांमध्ये गणल्या जाणाऱ्या गांगुलीने ठाकुरपुकूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फोनची किंमत 1 लाख 60 हजार रुपये इतकी सांगितली गेली आहे. असे सांगितले जात आहे की, फोन गांगुली स्वतः वापरत असल्यामुळे त्यात अनेक महत्वाच्या सोशल मीडिया खात्यांचा ऍक्सेस होता. त्याचसोबत त्याचे बँक खाते देखील मोबाईलशी जोडलेले होते. अशात भारतीय क्रिकेटपटूच्या खात्यातून चारांना पैशांची फेरफार देखील करता येऊ शकते. अशात पोलिस यावर लवकराच लवकर काय पाऊल उचरणार, हे पाहणे गरजेचे झाले आहे. अन्यता गांगुलीला मोठे नुकसान देखील सोसावे लागू शकते.
माहितीनुसार गांगुलीचा फोन चोरी गेला तेव्हा त्याच्या घरी रंगकाम चालू होते. अशात पोलिसांकडून घरात रंगकाम करण्यासाठी आलेल्या कामकारांची चौकशी होणे अपेक्षित आहे. माध्यमांमध्ये गांगुलीच्या हवाल्याने असे सांगितले गेले आहे की, “मला वाटते की माझा फोन घरातून चोरी झाला आहे. 19 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता मी माझा फोन शेवटचा पाहिला होता. त्यानंतर मी फोन शोधण्याचा प्रयत्न करत आहे. पण तो सावडला नाहीये. फोन हरवला याचे वाईट वाटत आहे. कारण त्यामध्ये अनेक मोबाईल नंबर होतते. तसेच वैयक्तिक माहितीही आणि अकाउंट डिटेल देखील होत्या. मी फोनचा शोध लागावा यासाठी योग्य ती कारवाई केली जाईल, यासाठी विनंती करतो.”
दरम्यान, गांगुलीचा मोबाईल फोन त्याच्या बेहला स्थित घरातून चोरी गेला आहे. घरात रंगकाम सुरू असताना ही चोरी झाली. माजी भारतीय क्रिकेटपटूने खूप शोधनही फोन न मिळाल्यावर त्याने पोलिसाथ धाव घेतली आहे. पोलीस यावर काय कारवाई करणार, हे पाहण्यासारखे असेल. (Sourav Ganguly’s expensive mobile stolen from home! Ex-veteran major damage, police complaint filed)
महत्वाच्या बातम्या –
IPL 2024 MI : रोहित शर्माची रितिकाच्या ‘त्या’ कमेंट्सनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…
Prithvi Shaw : शतक ठोकल्यानंतर पृथ्वी शॉचे धक्कादायक वक्तव्य ; म्हणाला ‘टीम इंडियात…