भारतीय नियामक मंडळाचा नवा अध्यक्ष भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली बनणार असल्याचे आता पक्के झाले आहे. त्याने सोमवारी बीसीसीआयच्या अध्यपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष बनल्याची अधिकृत घोषणा 23 ऑक्टोबरला केली जाणार आहे.
त्यामुळे सध्या गांगुलीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याचे अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी अभिनंदन केले आहे. यामध्ये भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगचा देखील समावेश आहे.
हरभजनने ट्विट केले आहे की ‘तू असा नेता आहेस की जो नेते घडवतो. गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष बनल्याबद्दल तूझे अभिनंदन. तूला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.’
You are a leader who empower others to be a leader congratulations @SGanguly99 for becoming @BCCI president..I wish you all the best going forward.. 🤗🤗🙏 pic.twitter.com/l2Xj2rIahR
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) October 16, 2019
हरभजनची कारकिर्द गांगुलीच्या नेतृत्वाखाली बहरली होती. हरभजनने अनेकदा भारताला मोठे विजय मिळवून दिले. गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने 2001 ला स्टिव्ह वॉच्या ऑस्ट्रेलियन संघाला कसोटीत पराभूत केले होते. भारताच्या या विजयात हरभजनने महत्त्वाचा वाटा उचलला होता.
हरभजनने भारताच्या विजयांमध्ये दिलेल्या योगदानाची आठवण ठेवत गांगुलीने हरभजनच्या शुभेच्छांच्या ट्विटला प्रतिक्रिया दिली आहे. गांगुलीने म्हटले आहे, ‘धन्यवाद हरभजन. तू ज्याप्रकारे भारताला सामने जिंकून देण्यासाठी एका बाजून गोलंदाजी केली त्याप्रमाणे तूझ्या पाठिंब्याची गरज आहे.’
Thank u bhajju …need your support in the same manner as u bowled from one end for india to win matches ..
— Sourav Ganguly (@SGanguly99) October 16, 2019