भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना दिल्ली येथे खेळला गेला. पहिल्या दोन सामन्यांनंतर मालिका बरोबरीत असल्याने हा सामना निर्णायक ठरला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेची दाणादाण उडवत त्यांना 27.1 षटकात अवघ्या 99 धावांवर सर्वबाद करत, मालिका जिंकण्याच्या दिशेने पाऊल टाकले. संघाच्या सर्वच गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली.
रांची वनडे जिंकून आत्मविश्वास मिळवलेल्या भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पुनरागमनानंतर केवळ दुसरा सामना खेळत असलेल्या वॉशिंग्टन सुंदरने तिसऱ्याच षटकात अनुभवी क्विंटन डी कॉकला बाद केले. त्यानंतर मोहम्मद सिराजने लागोपाठच्या षटकात जानेमन मलान व मागील सामन्यात शानदार फलंदाजी केलेल्या रिझा हेन्रिंक्स यांना तंबूत पाठवत भारताला सामन्यात पुढे केले.
त्यानंतर गोलंदाजासाठी आलेल्या शहाबाज अहमद व कुलदीप यादव या दोन्ही फिरकीपटूंनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना अक्षरशः नाकीनऊ आणले. कर्णधार डेव्हिड मिलर, ऐडन मार्करम या सामन्यात अपयशी ठरले. पहिल्या दोन्ही सामन्यात चांगली कामगिरी केलेल्या हेन्रिक क्लासेनने आपल्या कामगिरीत सातत्य ठेवले. त्याने संघासाठी सर्वाधिक 34 धावांचे योगदान दिले. या दौऱ्यावर प्रथमच खेळण्याची संधी मिळालेल्या अष्टपैलू मार्को जेन्सनने 14 धावा केल्या.
Innings Break!
Superb bowling peformance from #TeamIndia! 👏 👏
4⃣ wickets for @imkuldeep18
2⃣ wickets each for Shahbaz Ahmed, @mdsirajofficial & @Sundarwashi5Over to our batters now. 👍 👍
Scorecard 👉 https://t.co/XyFdjV9BTC #INDvSA pic.twitter.com/B2wUzvis4y
— BCCI (@BCCI) October 11, 2022
भारतासाठी सर्वच गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. वॉशिंग्टन सुंदर व सिराज यांनी सुरुवातीचे चार गडी बाद केले. दुसरा सामना खेळत असलेल्या अहमदने दोन तर, अनुभवी कुलदीप यादव याने सर्वाधिक चार गडी बाद केले. ही त्याच्या वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
INDvSA: मालिका निर्णायक सामन्यात नाण्याचा कौल भारताच्या बाजूने, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेवन
‘ही’ गोष्ट विजय किंवा पराभवाने ठरत नाही, रविचंद्रन अश्विनचे पीसीबी अध्यक्षांना सडेतोड प्रत्युत्तर