AUS vs SA WTC FINAL: दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीर फलंदाज एडन मार्करमने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात धमाकेदार शतक झळकावले आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना घाम फोडत मार्करमने त्यांना गुडघे टेकायला लावले. WTC फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेची टीम इतिहास रचण्याच्या अगदी जवळ पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी आता केवळ 72 धावांची गरज आहे आणि या सामन्यात अजून 2 दिवसांचा खेळ बाकी आहे.
एडन मार्करमने WTC फायनलमध्ये शतक झळकावत दक्षिण आफ्रिकेला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. मार्करमने हे शतक 156 चेंडूंमध्ये पूर्ण केले. या शानदार शतकी खेळीत त्याने 11 चौकार लगावले. विशेष म्हणजे आपले शतकही त्याने चौकार मारूनच पूर्ण केले. आज तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून मार्करम 159 चेंडूत नाबाद 102 धावांवर खेळत आहे.
दक्षिण आफ्रिकेचा हा सलामीवीर दुसऱ्या डावात जिथे शतक ठोकतो, तिथे पहिल्या डावात मात्र तो खातंही न उघडता माघारी परतला होता. पहिल्या डावात मार्करमने फक्त 6 चेंडूंचा सामना केला आणि शून्यावर बाद झाला. पण अंतिम टप्प्यात त्याच्या बॅटने काम केलं आणि आता दक्षिण आफ्रिकेला फक्त 69 धावा हव्या असून संघाकडे अजून ८ विकेट्स बाकी आहेत.





