वनडे विश्वचषक 2023 मध्ये मंगळवारी (24 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश हे संघ आमनेसामने आले होते. मुंबईचा वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 382 धावांचा डोंगर उभा केला होता. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजी पुढे केवळ 233 धावांमध्ये गारद झाला. यासह दक्षिण आफ्रिकेने 149 धावांनी मोठा विजय मिळवत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले.
(South Africa Beat Bangaladesh By 180 Runs de Kock Klassen And Bowlers Shines)