सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (india tour of South Africa) आहे. या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. तर सुरू असलेल्या वनडे मालिकेतही भारतीय संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. भारतीय संघाला सलग २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिका संघाने या मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान एकीकडे विजयाचा जल्लोष साजरा करत असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला मोठा फटका बसला आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा वनडे सामना (Sa vs Ind 2nd odi) शुक्रवारी (२१ जानेवारी) पार्लच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने अप्रतिम कामगिरी करत भारतीय संघावर ७ गडी राखून विजय मिळवला. परंतु हा सामना झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसीने) (ICC) दक्षिण आफ्रिका संघावर स्लो ओव्हर रेटमुळे २० टक्के दंड आकारला आहे.
व्हिडिओ पाहा- अतिशय महान खेळाडू जेव्हा स्वार्थापोटी आपली महानता विसरले
एमिरेट्स आयसीसी एलीट पॅनलचे सामनाधिकारी एंडी पाईक्रॉफ्ट यांचे म्हणणे आहे की, दक्षिण आफ्रिका संघाने निर्धारित वेळेपेक्षा १ षटक कमी फेकले आहे. परिणामी यजमान दक्षिण आफ्रिका संघावर हा दंड आकारण्यात आला आहे.
विधानात असे म्हटले गेले आहे की,”खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठीच्या आयसीसी आचारसंहितेच्या नियम २.२२ नुसार, जे किमान ओव्हर-रेटच्या गुन्ह्याशी संबंधित आहे. खेळाडूंना त्यांच्या संघाच्या निर्धारित वेळेपेक्षा कमी टाकलेल्या प्रत्येक षटकासाठी त्यांच्या मॅच फीच्या २० टक्के दंड आकारला जातो.”
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून रिषभ पंतने सर्वाधिक ८५ धावांची खेळी केली होती. या तर कर्णधार केएल राहुलने ५५ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला ५० षटक अखेर ६ बाद २८७ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाकडून जानेमन मलानने सर्वाधिक ९१ धावांची खेळी केली. तर क्विंटन डी कॉकने ७८ धावांचे योगदान दिले. हा सामना दक्षिण आफ्रिका संघाने ७ गडी राखून आपल्या नावावर केला.
महत्वाच्या बातम्या :
प्रजासत्ताक दिनी ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा असणार खास आकर्षण; हरियाणा सरकारने घेतलाय ‘हा’ निर्णय
लिलावात सहभागी होण्यापूर्वीच चेन्नईला मोठा धक्का; ज्याच्यावर होती नजर, त्याचीच लिलावातून माघार
हे नक्की पाहा: