दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 2024च्या टी20 विश्वचषकात चमकदार कामगिरी केली. पण त्यांना फायनलमध्ये भारताकडून पराभव पत्कारावा लागला. फायनल सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली होती. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर म्हणाले की, यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकच्या (Quinton de Kock) टी20 आंतरराष्ट्रीय भविष्याबद्दल अद्याप स्पष्टता नाही.
दक्षिण आफ्रिकेचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी काॅकने (Quinton de Kock) कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे. आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक वॉल्टर पत्रकार परिषदेत म्हणाले, “खरे सांगायचे तर मला माहीत नाही. सध्या डी काॅक आणि माझ्यामध्ये त्याला पुन्हा दक्षिण आफ्रिकेकडून खेळायचे आहे की नाही याबद्दल कोणतीही चर्चा नाही. मी त्याच्यासाठी दार उघडे ठेवले आहे, त्याला हवे असल्यास तो माझ्याशी संपर्क साधू शकतो, पण असे कधीच होणार नाही.”
पुढे बोलताना वॉल्टर म्हणाले, “कदाचित आपण कधीतरी बोलू, पण त्याचा अर्थ संघात निवड होईल असे नाही. आता सर्वात महत्वाची गोष्ट कामगिरी असेल. तो अजून इतका म्हातारा झालेला नाही की त्याच्या कामगिरीच्या जोरावर त्याच्या पुनरागमनाची चर्चा होऊ शकत नाही.”
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2025: केएल राहुलची होणार सुट्टी? लखनऊला मिळणार नवा कर्णधार?
बांगलादेशच्या ‘या’ खेळाडूपासून भारताला राहावे लागणार सावध! भारताविरूद्ध धमाकेदार आकडेवारी
श्रीलंकेने रचला इतिहास, 10 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये जिंकली कसोटी; निसांका विजयाचा शिल्पकार