---Advertisement---

भारतीय गोलंदाजांची पुन्हा धुलाई! रुसोच्या तुफानी शतकाने दक्षिण आफ्रिका 3 बाद 227

On: मंगळवार, ऑक्टोबर 4, 2022 8:51 PM
---Advertisement---

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा सामना इंदोर येथे खेळला गेला. मालिकेतील पहिले दोन सामने गमावलेल्या दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात शानदार फलंदाजी करत भारतीय संघासमोर धावांचे लक्ष ठेवले. रायली रूसोचे वादळी शतक व सलामीवीर क्विंटन डी कॉक याने झळकावलेले दमदार अर्धशतक दक्षिण आफ्रिकेच्या डावाची वैशिष्ट्ये ठरली.

 

नाणेफेक जिंकून भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. संघाचा कर्णधार टेंबा बवुमा पुन्हा एकदा अपयशी ठरला व केवळ तीन धावा करून माघारी परतला. मात्र, डी कॉकने कोणतेही दडपण न घेता भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने भारतीय फलंदाजांचा पुरता घाम काढत 43 चेंडूवर 68 धावांची खेळी केली. यामध्ये 6 चौकार व 4 षटकारांचा समावेश होता. दुसरीकडे पहिल्या दोन सामन्यात खातेही न खोलू शकलेल्या रायली रुसोने त्यापेक्षा अधिक वेगात फलंदाजी केली. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 48 चेंडूवर नाबाद 100 धावा केल्या. यात 7 चौकार व 8 षटकारांचा समावेश होता. युवा फलंदाज ट्रिस्टन स्टब्स याने देखील रूसोला सुयोग्य साथ देत 23 धावा केल्या. अखेरच्या षटकात फलंदाजीला आलेल्या डेव्हिड मिलरने तीन षटकारांच्या मदतीने 5 चेंडूवर 19 धावांचा तडाखा दिला.

भारतीय संघासाठी दीपक चहर व उमेश यादव यांनी प्रत्येकी बळी मिळवला. तर एक फलंदाज धावबाद झाला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तिसऱ्या टी-20त भारतीय संघात होऊ शकतात हे महत्वाचे बदल! पाहा संभावित प्लेइंग इलेव्हन
आता वर्ल्डकपमध्ये भारताचं काही खरं नाय! दिग्गजच म्हणालाय, ‘टीम इंडियात बुमराहसारखा कुणीच नाही’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---