जागतिक साथीचा रोग कोरोना व्हायरसमुळे क्रीडा जगत बर्याच काळापासून पूर्णपणे ठप्प आहे. दरम्यान, आयसीसीच्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करून क्रिकेट हळू- हळू सुरू केले जात असून क्रिकेट बोर्डही त्याच तयारीत गुंतले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी यजमानपद स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनेही अतिशय अनोख्या मार्गाने मैदानात परतण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने मैदानात परतण्यासाठी इतिहासातील सर्वात वेगळा सामना खेळण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यात २ नाही तर ३ संघात सामना खेळला जाणार आहे.
हा सामना २७ जून रोजी सेंच्युरियन पार्क मैदानावर खेळला जाईल. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने प्रस्तावित केलेल्या या प्रदर्शन सामन्यात एबी डिविलियर्ससह अनेक बरीच मोठी नावे दिसतील. इतकेच नाही, तर या सामन्याचे नियमही सर्वसाधारण सामन्यांपेक्षा खूप वेगळे असतील.
२७ जून रोजी सेंच्युरियन पार्क येथे ३ संघ खेळतील, त्यातील एका संघाचे नेतृत्व माजी खेळाडू डिविलियर्स (AB De Villiers) करणार आहे. तर दुसर्या संघाचे नेतृत्व सध्याचा कर्णधार क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) आणि तिसर्या संघाचे नेतृत्व कागिसो रबाडा (Kagiso Rabada) करणार आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने बुधवारी (१७ जून) अधिकृतपणे या सामन्यांची घोषणा केली आहे.
एकता कपच्या नावाखाली हा सामना एक चॅरिटी सामना खेळला जाणार आहे. ज्याद्वारे जमा झालेले सर्व पैसे कोरोना व्हायरस बाधित व्यक्तींना मदत करण्यासाठी दान केले जातील.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनेही या अनोख्या सामन्याचे नियम बदलले आहेत. त्यानुसार प्रत्येक संघात ८ खेळाडू असतील. आणि ३६ षटकांचा सामना खेळला जाईल. ज्यामध्ये प्रत्येक १८ षटकांत ब्रेक घेतला जाईल. त्यामध्ये प्रत्येक संघ ६-६ षटके फलंदाजी करेल आणि १८ षटकांनंतर पुन्हा ६-६ षटके फलंदाजी करतील. इतकेच नाही तर संघाची ७ वी विकेट पडल्यास एकटा खेळाडू फलंदाजी करू शकतो. परंतु त्याला १ ऐवजी २ धावा कढाव्या लागतील. जर पहिल्या हाफमध्ये ७ पेक्षा कमी विकेट पडल्या, तर उर्वरित फलंदाज दुसऱ्या हाफमध्ये त्याच प्रकारे फलंदाजी करेल.
गोलंदाजीच्या बाबतीत प्रत्येक संघाला विरोधी संघाविरूद्ध नवीन चेंडू वापरावा लागेल. शिवाय प्रत्येक गोलंदाज जास्तीत जास्त ३ षटके गोलंदाजी करू शकेल. सामना जिंकणार्या संघाला सुवर्ण, द्वितीय क्रमांकाला रौप्य आणि तिसऱ्या क्रमांकाच्या संघाला कांस्य चषक देण्यात येईल. आणि जर सामना दोन संघात बरोबरीत सुटला, तर त्याचा निर्णय सुपर ओव्हर खेळवून केला जाईल. आणि जर तिन्ही संघात असं झालं तर तिन्ही संघांना सुवर्ण चषक दिले जाईल.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या (Cricket South Africa) वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या दरम्यान स्पष्ट केले आहे, “आयोजनावेळी कोणतीही सूट दिली जाणार नाही. आणि कोरोना व्हायरससाठी (Corona Virus) दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना पाळल्या जातील. रिकाम्या मैदानावर हा सामना आयोजित केला जाईल.”
हा सामना प्रसारित केला जाणार आहे. आणि या सामन्याच्या आयोजनासाठी २०० लोकांची आवश्यकता असणार आहे. प्रत्येकाला मैदानात मास्क घालावे लागतील. तसेच, सर्व सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी असणार आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-८ संघांना घेऊन या देशात होणार मोठी क्रिकेट लीग, खेळणार तब्बल ४८ सामने
-कोरोना इफेक्ट: ‘या’ बोर्डाने ४० कर्मचाऱ्यांना काढले कामावरून
-मोठी बातमी: ७ वर्षांच्या बंदीनंतर श्रीसंत या संघाकडून पुनरागमन करण्यास सज्ज