भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या चार सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा झाली आहे. उभय संघांमधील ही मालिका 8 ते 15 नोव्हेंबर दरम्यान खेळली जाईल. टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यानंतर दोन्ही देश पहिल्यांदाच एकमेकांशी भिडणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या संघात हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर आणि केशव महाराज परतले आहेत. गेराल्ड कोएत्झी आणि मार्को जॅन्सेन यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय अष्टपैलू मिहलाली मोंगवानाचा प्रथमच संघात समावेश करण्यात आला. 24 वर्षीय मिहलालीनं दक्षिण आफ्रिका टी20 चॅलेंजमध्ये 14.08 च्या सरासरीनं 12 बळी घेतले होते. अनकॅप्ड अष्टपैलू अँडिले सिमेलेन देखील संघाचा भाग असेल, ज्याची दुसऱ्यांदा संघात निवड झाली आहे.
लुथो सिपमला तिसऱ्या आणि चौथ्या टी20 सामन्यासाठी संघात समाविष्ट करण्यात आलंय. हा 26 वर्षीय खेळाडू फेब्रुवारी 2021 नंतर प्रथमच मर्यादित षटकांच्या संघात परतत आहे. त्यानं दक्षिण आफ्रिका टी20 चॅलेंजमध्ये प्रभावी कामगिरी केली होती. त्यानं रविवारीच या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 12 धावांत 4 बळी घेतले, जी त्याच्या टी20 कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी होती. कागिसो रबाडाला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तर लुंगी एनगिडी निवडीसाठी उपलब्ध नव्हता.
भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ – एडन मार्करम (कर्णधार), ओटनीएल बार्टमन, ट्रिस्टन स्टब्स, जेराल्ड कोएत्झी, डोनावन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मोंगवाना, न्काबा पीटर, रायन सिमलेटोन आणि लुईले सिमलेटोन (तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यांसाठी)
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत टी20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवार 8 नोव्हेंबर रोजी डरबन येथे खेळला जाईल. तर दुसरा सामना 10 नोव्हेंबर रोजी गकाबेरहा येथे खेळवला जाईल. तिसरा सामना 13 नोव्हेंबरला सेंच्युरियनमध्ये तर चौथा सामना जोहान्सबर्गमध्ये शुक्रवारी 15 नोव्हेंबरला होणार आहे.
हेही वाचा –
भारत-न्यूझीलंड तिसऱ्या कसोटीची पिच कशी आहे? जाणून घ्या वानखेडे स्टेडियमवरील कसोटी सामन्यांचे रेकॉर्ड
जसप्रीत बुमराह तिसऱ्या कसोटीत खेळणार नाही, टीम मॅनेजमेंटचा धक्कादायक निर्णय!
पुन्हा जिवघेणा बनला क्रिकेटचा खेळ, डोक्याला चेंडू लागून 15 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू