---Advertisement---

भारताची एकदिवसीय मालिकेत 2-0 ने आघाडी, स्मृती मानधाना, हरमनप्रीत कौरचे झंझावाती शतक

On: बुधवार, जून 19, 2024 11:29 PM
INDW vs RSAW
---Advertisement---

भारतीय महिला क्रिकेट संघ (INDW) आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ (RSAW) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (19 जून) रोजी बंगळुरु येथे खेळला गेला. सलग दुसरा एकदिवसीय सामना जिंकून भारतानं या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

भारतानं दिलेल्या 326 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डनं (Laura Wolvaardt) 135 चेंडूत 135 धावांची खेळी खेळली. यादरम्यान तिनं 12 चौकार आणि 3 उत्तुंग षटकार ठोकले. तर मारिझाने कापनं (Marizanne Kapp) 94 चेंडूत 114 धावा ठोकल्या. त्यामध्ये तिनं 11 चौकारांसह 3 उत्तुंग षटकार ठोकले. वोल्वार्ड आणि काप यांनी 184 धावांची भागीदारी करुनही आफ्रिकेनं 50 षटकात 6 विकेट्स गमावून केवळ 321 धावाच केल्या.

शेवटी कर्णधार वॉलवार्टनं नॅडिन डी क्लर्क सोबत पाचव्या विकेटसाठी 41 चेंडूत 69 धावांची भागीदारी केली. परंतु ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. तर भारतासाठी पूजा वस्त्राकर आणि दीप्ति शर्मा यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले. तर अरुंद्धती रेड्डी आणि उपकर्णधार स्मृती मानधनानं 1-1 विकेट घेतली आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

तत्पूर्वी भारतानं प्रथम फलंदाजी करताना 3 गडी गमावून 325 धावा ठोकल्या होत्या. त्यामध्ये सलामीवीर स्मृती मानधनानं 120 चेंडूत 133 धावांची खेळी खेळली. मानधनानं सलग दुसरे शतक झळकावले आणि भारतासाठी सलग दोन शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला ठरली. तर कर्णधार हरमनप्रीत कौरनं 88 चेंडूत नाबाद 103 धावा ठोकल्या. यादरम्यानं तिनं 9 चौकार आणि 3 उत्तुंग षटकार लगावले. रिचा घोषनं शेवटी 13 चेंडूत 25 धावांची आक्रमक खेळी खेळली आणि संघाला 325 च्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

दक्षिण आफ्रिकेसाठी गोलंदाजी करताना नॉनकुलुलेको मलाबानं 2 तर मसाबता क्लासनं 1 विकेट घेतली तर आफ्रिकेसाठी दुसरी कोणतीही गोलंदाज विकेट्स घेण्यासाठी यशस्वी झाली नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

क्विंटन डी कॉकचं झंझावाती अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेनं अमेरिकेसमोर ठेवलं 195 धावांचं आव्हान
सुपर 8 सामन्यापूर्वी ‘किंग’ कोहलीच्या कमबॅकवर आकाश चोप्रानं केली भविष्यवाणी
सुपर 8च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं हारला टाॅस; पाहा दोन्ही संघांच्या प्लेइंग 11

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---