---Advertisement---

सुपर ओव्हरपूर्वीच जिंकला असता अफगाणिस्तान! ‘ती’ एक चूक ठरली पराभवाचं मुख्य कारण

On: बुधवार, फेब्रुवारी 11, 2026 9:13 PM
Afganistan Cricket Team
---Advertisement---

श्वास रोखून धरायला लावणाऱ्या एका अत्यंत चुरशीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa vs Afganistan) अफगाणिस्तानचा पराभव केला. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये डेव्हिड मिलरच्या (David Miller) धडाकेबाज फलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरला.

अफगाणिस्तानच्या रहमानुल्लाह गुरबाजने (Rahmanullah Gurbaaj) आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण शेवटच्या चेंडूवर मोठा शॉट मारण्यात तो अपयशी ठरला. पराभवानंतर अफगाणिस्तानचे खेळाडू मैदानात भावूक झालेले पाहायला मिळाले.

खरं तर, एका क्षणी असे वाटत होते की अफगाणिस्तान हा सामना सहज जिंकेल. सामना पूर्णपणे त्यांच्या बाजूने झुकलेला दिसत होता. मात्र, शेवटच्या ओव्हरमध्ये झालेली एक चूक अफगाणिस्तानला चांगलीच महागात पडली.

20 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर नूर अहमदने जोरदार फटका मारला आणि दोन धावा घेण्यासाठी तो धावला. नूर अहमद क्रीजवर सुखरूप पोहोचला, पण धाव घेताना फजलहक फारुकीने म्हणावा तसा वेग दाखवला नाही आणि तो रनआऊट झाला. जर फारुकी थोडा वेगाने धावला असता, तर अफगाणिस्तानने हा सामना सुपर ओव्हरपर्यंत न जाताच जिंकला असता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---