---Advertisement---

भर मैदानात जेव्हा खेळाडू करतात शिवीगाळ…

---Advertisement---

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघात केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात जोस बटलर आणि वर्नोन फिलँडर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली.

दक्षिण आफ्रिकेच्या दुसर्‍या डावात फिलँडर फलंदाजी करीत असताना इंग्लंडचा यष्टिरक्षक जॅास बटलरने त्याला शिवीगाळ केली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसर्‍या सामन्यात दक्षिण अफ्रिका पराभवाच्या उंबरठयावर होती. पाचव्या आणि शेवटच्या दिवशी सामना वाचविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते.

जेव्हा फिलँडर त्याच्या संघासाठी सामना वाचवण्याचा प्रयत्न करीत होता, तेव्हा दक्षिण आफ्रिकेकडे फक्त तीन विकेट बाकी होत्या. त्याचवेळी विकेटच्या मागे उभे असलेल्या जॅास बटलरने त्याला स्लेजिंग करायला सुरुवात केली.

या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडियोमध्ये बटलर विकेटच्या मागून फिलँडरला शिवीगाळ करताना दिसत आहे. फिलँडर मात्र यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

यावेळी स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या बेन स्टॉक्सनेही फिलँडरला उचकवण्याचा प्रयत्न केला. पण फिलँडरला काही फरक पडलेला दिसून नाही. बटलरचा आवाज स्टंप माईकमधून ऐकू येत होता.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाज डेल स्टेनने लिहिले की, ‘हा खूप मोठ्या आवाजात आणि स्पष्ट होते.’

फिलँडरने या डावात 51 चेंडूंचा सामना करत 8 धावा केल्या, परंतु आफ्रिकेच्या संघाला पराभवापासून त्याला वाचविता आले नाही. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला 189 धावांनी हरवून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---