---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेत विजय मिळवणे भारतासाठी दुर्मिळच! आत्तापर्यंत गमावल्यात ‘एवढ्या’ वनडे मालिका

On: शनिवार, जानेवारी 22, 2022 4:47 PM
---Advertisement---

पार्ल। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) यांच्यात बोलंड पार्क येथे शुक्रवारी ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला ७ विकेट्सने पराभवाची धूळ चारली. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. पण, भारताला मात्र, पाचव्यांदा दक्षिण आफ्रिकन भूमीत द्विपक्षीय वनडे मालिका जिंकण्यात अपयश आले आहे. 

भारताची दक्षिण आफ्रिकेतील वनडे मालिकांमधील कामगिरी
भारताने १९९२ पासून दक्षिण आफ्रिकेत ६ द्विपक्षीय वनडे मालिका खेळल्या आहेत. तसेच दोन तिरंगी मालिका खेळल्या आहेत. मात्र, यामध्ये केवळ २०१८ साली झालेल्या वनडे मालिकेत भारताने विजय मिळवला आहे. त्यावेळी विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ६ सामन्यांच्या वनडे मालिकेत ५-१ असा विजय मिळवला होता.

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळलेल्या द्विपक्षीय मालिकांचा विचार केला, तर १९९२ साली भारताला ५-२ फरकाने, २००६ साली ४-० फरकाने, २०११ साली ३-२ फरकाने, २०१३ साली २-० फरकाने पराभूत व्हाले लागले आहे. तसेच आता चालू २०२२ वनडे मालिकेतही दक्षिण आफ्रिकेने विजयी आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे केवळ २०१८ सालचा अपवाद वगळला तर भारताने दक्षिण आफ्रिकेत सर्व द्विपक्षीय मालिका गमावल्या आहेत.

त्याचबरोबर २००१ साली भारत, केनिया आणि दक्षिण आफ्रिका या तीन संघात झालेल्या तिरंगी मालिकेतही अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर मात करत मालिकेचे विजेतेपद पटकावले होते. तर १९९७ साली झिम्बाब्वे, भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात झालेल्या तिरंगी मालिकेतही दक्षिण आफ्रिका विजयी ठरली होती.

अधिक वाचा – बीसीसीआयकडून विराटला मिळणार होती कारणे दाखवा नोटीस? गांगुलीने दिले स्पष्टीकरण

डीकॉकची तुफानी खेळी
शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या वनडेत भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २८७ धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर २८८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून जानेमन मलान आणि यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डीकॉक यांनी सलामीला १३२ धावांनी दमदार भागीदारी करत विजयाचा पाया रचला. ही नोव्हेंबर २०१७ नंतर दक्षिण आफ्रिकेकडून मायदेशात झालेली पहिली शतकी सलामी भागीदारी ठरली.

दरम्यान, एकाबाजूने मलान संयमी खेळी करत असताना डीकॉकने तुफानी खेळी केली. त्याने ६६ चेंडूत ७८ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ७ चौकार आणि ३ षटकार मारले. यष्टीरक्षक फलंदाज असलेल्या डीकॉकने आत्तापर्यंत भारताविरुद्ध खेळताना १५ वनडेत ५९.२६ च्या सरासरीने ८०० पेक्षा अधिक धावा काढल्या आहेत.

त्यामुळे भारताविरुद्ध वनडेत कमीत कमी ५०० धावा करणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाजांमध्ये डीकॉकची सरासरीन सर्वोत्तम ठरली आहे. त्याच्यापाठोपाठ या यादीत शाय होप आहे. त्याने ५२.८४ च्या सरासरीने धावा केल्यात, तर कुमार संगकाराने ४०.४९ च्या सरासरीने धावा केल्यात.

व्हिडिओ पाहा – सचिन-कांबळीच्या करामतीने गांगुलीच्या रुममध्ये झालेलं पाणीच पाणी

दुसऱ्या वनडेबद्दल बोलायचे झाल्यास मलान आणि डीकॉकला कर्णधार तेंबा बावूमा (३५), एडेन मार्करम (३७*) आणि रस्सी वॅन डर ड्यूसेन (३७*) यांनी चांगली साथ दिली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने ४८.१ षटकात ३ विकेट्सच्या मोबदल्यात सहज विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या – 

ना गोलंदाजीत, ना फलंदाजीत कमाल! द. आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वनडेत भारताच्या पराभवाची ४ मुख्य कारणे

“टीम इंडियाला अतिआत्मविश्वास नडला”

भुवीच्या बाबतीत दक्षिण आफ्रिका आणि विकेट्स यांच जरा वाकडंच! दुसऱ्या वनडे नकोसा विश्वविक्रम नावावर

सचिन-कांबळीच्या करामतीने गांगुलीच्या रुममध्ये झालेलं पाणीच पाणी| Sachin-Kambli Prank on Ganguly

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---