टी२० विश्वचषक स्पर्धेचा थरार सुरू असतांनाच, अचानक एका वेगळ्याच मुद्याने उचल खाल्ली आहे. क्विंटन डी कॉकने अचानक टी-२० विश्वचषकातील वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मंगळवारी (२६ ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेचा आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना रंगला. या सामन्यात डी कॉकने खेळण्यास नकार दिला घेतला. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यापूर्वी ‘ब्लॅक लाइव्ह्स मॅटर’ मोहिमेचा भाग म्हणून एका गुडघ्यावर बसण्यास नकार देखील दिला होता. यावर आता दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने एक निवेदन जारी केले की, ‘ब्लॅक लाइव्ह्स मॅटर’ चळवळीच्या समर्थनार्थ आगामी टी२० विश्वचषकाच्या सामन्यांपूर्वी सर्व खेळाडूंना एका गुडघ्यावर बसावे लागेल. मात्र, अनेक खेळाडूंनी डी कॉकसोबत असे केले नाही, त्यामुळे त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. या दरम्यान खेळाडू एकतर उभे राहिले किंवा मुठीत बंद करून हात वर करताना दिसले.
यासंदर्भात, दक्षिण आफ्रिका क्रिकेटने, क्विंटन डी कॉकला वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी २० विश्वचषक सामन्यातून माघार घेण्यामागील नेमके कारण स्पष्ट करण्यास सांगितले आहे. त्याच्या उत्तराचे मंडळ वाट पाहत आहे, कारण संघात अजून त्याची खूप कारकीर्द शिल्लक आहे.
वेस्टइंडिजविरुद्धच्या सामन्यापूर्वी खेळाडूंनी ‘गुडघे टेकले’ पाहिजेत असे निर्देश दक्षिण आफ्रिका मंडळाने खेळाच्या काही तास आधी जारी केल्यानंतर डी कॉकने आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याचा हवाला देत तसे करण्यास नकार दिला होता.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाच्या एका प्रवक्त्याने बुधवारी (२७ ऑक्टोबर) म्हटले की, डी कॉक जगातील आघाडीच्या फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जातो, शक्य तितक्या लवकर तो त्याचे म्हणने मांडेल.’ त्यांनी हे ही म्हटले की, तो संघाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. पण त्याच्या उत्तरानंतर मंडळ त्याचे भविष्य ठरवणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बांगलादेशच्या फलंदाजाला स्कूप शॉट पडला महागात, असा झाला झेलबाद; पाहा व्हिडिओ
ज्यांनी पराभूत केले त्याच पाकिस्तानी गोलंदाजांचे केन विलियम्सनकडून तोंड भरून कौतुक; म्हणाला…