कोविड-१९ महामारीमुळे बंद असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला खऱ्या अर्थाने २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकांना सुरुवात होईल. त्यापैकी न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेवेळी, दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू वर्णद्वेषाविरूद्ध सुरू असलेल्या ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर्स’ या मोहिमेच्या समर्थनार्थ गुडघ्यावर बसणार नाहीत.
मार्क बाऊचरने दिली माहिती
दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यातील आगामी टी२० मालिकेत तुम्ही ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर्स’ या मोहिमेला समर्थन देणार का?, असा प्रश्न दक्षिण आफ्रिकेचा प्रशिक्षक मार्क बाऊचरला विचारला गेला होता. त्याला उत्तर देताना तो म्हणाला, “आम्ही आगामी मालिकेत ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर्स’ मोहिमेला गुडघ्यावर बसून समर्थन देणार नाही. कारण, १२ जुलै रोजी झालेल्या सॉलिडीटरी कपमध्ये आम्ही ही गोष्ट केली होती. त्यावेळी दक्षिण आफ्रिका क्रिकेटचे सर्व पदाधिकारी, प्रशिक्षक आणि खेळाडू यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला होता. त्यावेळी आम्ही दंडावर काळी पट्टी देखील बांधली होती.”
फक्त देखावा करण्याची गरज नाही, लोकांच्या मानसिकतेत फरक पडला पाहिजे
बाऊचर पुढे बोलताना म्हणाला, “या मोहिमेची दक्षिण आफ्रिका संघात सुरुवात करणाऱ्या लुंगी एंगिडी याच्याशी आम्ही चर्चा केली आहे. ही गोष्ट फक्त देखावा करण्यासारखी नाही, तर याने लोकांच्या मानसिकतेत बदल व्हायला हवा. आम्ही दुसऱ्या मार्गाने या मोहिमेला कायम पाठिंबा देऊ.”
अमेरिकेतून झाली होती मोहिमेला सुरुवात
अमेरिकेत कृष्णवर्णीय लोकांवर झालेल्या हल्ल्यानंतर, ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर्स’ या मोहिमेने जोर धरला होता. लॉकडाऊननंतर झालेल्या पहिल्या वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यातील मालिकेत उभय संघातील खेळाडूंनी, गुडघ्यावर बसून या मोहिमेला समर्थन दिले होते. त्यानंतर प्रत्येक क्रिकेट स्पर्धेमध्ये या मोहिमेला पाठिंबा दर्शवला गेला. नुकत्याच संपलेल्या आयपीएल २०२० मध्ये देखील भारतीय खेळाडू हार्दिक पंड्याने अर्धशतकानंतर गुडघ्यावर बसून या मोहिमेला समर्थन दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिला कसोटी सामना सुरु होण्यापुर्वी का दोन्ही संघांचे खेळाडू बसले होते गुघड्यावर
ऑस्ट्रेलियन संघ मैदानात उतरणार अनवाणी पायांनी; कारण आहे खूपच कौतुकास्पद