---Advertisement---

WTC अंतिम सामना जिंकल्यानंतर कागिसो रबाडा का संतापला? जाणून घ्या नेमकं कारण

On: रविवार, जून 15, 2025 2:26 PM
---Advertisement---

साऊथ आफ्रिका संघाने वर्ल्ड कप फायनल मध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करून पहिल्यांदा ट्रॉफी त्यांच्या नावावर केली. या सामन्यात साऊथ आफ्रिका संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी अतिशय चांगली झाली होती. जिथे फलंदाजी मध्ये एडेन मार्करमने शानदार प्रदर्शन केले तसेच रबाडाने चांगली गोलंदाजी करत 9 विकेट्स घेतल्या. ज्यामध्ये 5 विकेट्स पहिल्या तर 4 विकेट्स दुसऱ्या डावात घेतल्या होत्या.

तसेच सामन्यानंतर कागिसो रबाडा थोडा भडकलेला दिसून आला, आणि त्याच्या वक्तव्याने खळबळ निर्माण झाली. सामना जिंकल्यानंतर रबाडाने म्हटले, आम्ही खूप मेहनत करून इथपर्यंत पोहोचलो आहोत आणि इथे पोहोचण्याचे देखील नक्कीच आम्ही हकदार आहोत.


काही लोकांनी म्हटले की, आम्ही मोठ्या आणि मजबूत संघाचा सामना केला नाही. जी गोष्ट खूप खराब आहे. आम्ही यावेळी ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आणि आमचं सर्वोत्तम प्रदर्शन केलं. आम्हाला पाठिंबा दिलेल्या चाहत्यांचे मनापासून धन्यवाद आणि मागचे चार दिवस आम्हाला घरेलु क्रिकेट सारखे वाटले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---