येत्या मार्च महिन्यात भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात मर्यादित षटकांची मालिका भारतात आयोजित करण्यात येणार आहे. या मालिकेचे आयोजन केसीए (केरळ क्रिकेट असोसिएशन) मध्ये आयोजित करण्यात येणार होते. परंतु केसीए ने असमर्थता दर्शवली आहे. यांनतर बंगळूरूचे चिन्नास्वामी स्टेडियम आयोजनाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे.
केसीएचे सचिव श्रीजीत वी नायर यांनी मुलाखतीत म्हटले की, “मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तीन एकदिवसीय आणि ५ आंतरराष्ट्रीय सामन्यांव्यतिरिक्त १४ दिवसाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार होते. परंतु ग्रीनफिल्ड स्पोर्ट्स हबच्या मालकाने सेना भरतीशी निगडित असलेल्या कार्यक्रमासाठी हे मैदान आरक्षित केले आहे. त्यामुळे आम्ही असर्मथता दाखवली. बीसीसीआयला या गोष्टीची माहिती केसीएने दिली आहे.”
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, बंगळूरू एक चांगला विकल्प आहे. परंतु कोरोना असल्यामुळे शासनाच्या निर्णयाची वाट पाहत आहोत.
अजुनपर्यंत बीसीसीआय आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने या मालिकेची घोषणा नाही केली आहे. परंतु भारतीय महिला क्रिकेटपटूंना या मालिकेची पूर्वकल्पना देण्यात आली आहे. भारतीय महिला संघाने गेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीनंतर एकही सामना नाही खेळला . त्यांनतर महिला खेळाडूंनी शारजाहमध्ये फक्त टी -२० चॅलेंज स्पर्धा खेळली होती. जर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिका झाली तर, कोरोनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने संघाला २ आठवड्यापूर्वी एकत्र यावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! मोठ्या टी२० स्पर्धेतून ऑस्ट्रेलियाची माघार, बांगलादेश घेणार जागा
‘या’ कारणामुळे भारत सध्या जगातील अव्वल संघ, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केले मनभरून कौतुक
“खेळपट्टीबद्दल विचार करण्याऐवजी आपल्या मानसिकतेत बदल करावा”, भारतीय क्रिकेटरचे चोख प्रतिउत्तर






