यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीतील (ICC Champions Trophy 2025) तिसरा सामना अफगाणिस्तान विरूद्ध दक्षिण आफ्रिका (Afghanistan vs South Africa) संघात खेळला गेला. या सामन्यात आफ्रिकेने 107 धावांनी शानदार विजय मिळवला.
रायन रिकेल्टनच्या (Ryan Rickelton) शानदार शतकामुळे आणि नंतर कागिसो रबाडाच्या (Kagiso Rabada) घातक गोलंदाजीमुळे, दक्षिण आफ्रिकेने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली.
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 315 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघ 208 धावांवर गारद झाला. अफगाणिस्तानकडून रहमत शाहने (Rahmat Shah) 90 धावा केल्या पण तो केवळ पराभवाचे अंतर कमी करू शकला.
316 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाचा स्टार फलंदाज रहमानउल्लाह गुरबाज 10 धावा काढून बाद झाला. यानंतर इब्राहिम झद्रानही 17 धावा काढून बाद झाला. त्यानंतर सेदिकुल्लाह अटल 16 धावांवर, तर कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी शून्यावर तंबूत परतला.
अफगाणिस्तानने फक्त 50 धावांत 4 विकेट गमावल्या. एका बाजूला रहमत शाह ठाम राहिला. दरम्यान त्याने 90 धावा केल्या, तर दुसऱ्या बाजूला अफगाण फलंदाज सतत बाद होत राहिले. दरम्यान, अजमतुल्लाह उमरझाई 18 धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर मोहम्मद नबीही 13 धावा, रशीद खानने 18 धावा केल्या.
आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. याशिवाय, वियान मुल्डर आणि लुंगी न्गिडी यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. केशव महाराज आणि मार्को जॅन्सेन यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली. त्याआधी फलंदाजीत रॉयल रिकल्टनने 103 धावा, टेम्बा बावुमाने 58 धावा, रॅसी व्हॅन डर ड्यूसेनने 52 आणि एडेन माक्ररमनेही 52 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
Ind vs Pak: “आम्ही दुबईत भारताला दोनदा हरवले” सामन्यापूर्वीच पाकिस्तानी खेळाडूचे मोठे वक्तव्य!
Champions Trophy; भारत-पाकिस्तान सामन्यात कोण मारणार बाजी? माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी
RCB vs MI: एलिसे पेरीचे झंझावाती अर्धशतक! मुंबईसमोर 168 धावांचे आव्हान






