आयपीएलच्या मेगा लिलावाची (IPL Mega Auction) चाहत्यांना नक्कीच उत्सुकता आहे. आयपीएल 2025चा मेगा लिलाव आतापासून काही दिवसात होणार आहे. ज्यामध्ये देश-विदेशातील एकूण 574 खेळाडू सहभागी होणार आहेत. या नावांना भारतीय नियामक मंडळाने (BCCI) मान्यता दिली आहे. त्यानंतर आता हे खेळाडू लिलावाच्या टेबलावर दिसणार आहेत. दक्षिण आफ्रिकेचा स्टार फिनिशर डेव्हिड मिलरही (David Miller) आयपीएल मेगा लिलावात दिसणार आहे. कारण त्याला गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) संघात कायम ठेवले नाही.
डेव्हिड मिलरसाठी (David Miller) अनेक फ्रँचायझींमध्ये स्पर्धा होऊ शकते. त्यामुळे या बातमीद्वारे आपण आयपीएल 2025 मेगा लिलावात डेव्हिड मिलरला करारबद्ध करण्यासाठी कोणते 3 संघ सर्वतोपरी प्रयत्न करू शकतात. हे जाणून घेऊया.
1) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) आगामी आयपीएल हंगामासाठी 3 खेळाडूंना रिटेन केले आहे. त्यामुळे मेगा लिलावादरम्यान अनेक स्टार खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील करण्याचे संघाचे लक्ष्य असेल. अशा परिस्थितीत आरसीबी (RCB) डेव्हिड मिलरला (David Miller) कोणत्याही किंमतीत संघात सामील करू शकते. मिलर आरसीबीसाठी उत्कृष्ट फिनिशरची भूमिका बजावू शकतो.
2) गुजरात टायटन्स- आयपीएलच्या गेल्या 3 हंगामात गुजरातसाठी फिनिशरची भूमिका बजावत असलेल्या डेव्हिड मिलरला (David Miller) कायम ठेवण्याच्या कालावधीत ते कायम ठेवू शकले नाहीत. पण आगामी मेगा लिलावात गुजरात फ्रँचायझी या खेळाडूला कोणत्याही किंमतीत घेऊ शकते.
3) पंजाब किंग्ज- आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज (Punjab Kings) पुन्हा एकदा नव्याने तयारी करण्याच्या तयारीत आहे. आगामी आयपीएल हंगामासाठी पंजाबने केवळ 2 अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवले आहे. त्यामुळे पंजाबचे लक्ष्य अनेक स्टार खेळाडूंवर असेल. पंजाब किंग्ज लिलावादरम्यान डेव्हिड मिलरला (David Miller) लक्ष्य करू शकतात.
David Miller has arrived in IPL 2023.
481 runs including 68.71 average & 142.73 strike rate in IPL 2022 followed by 31*(16) in the first match in IPL 2023. pic.twitter.com/lLzaXZGbCO
— Johns. (@CricCrazyJohns) April 4, 2023
डेव्हिड मिलरच्या (David Miller) आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने 130 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 36.55च्या सरासरीने फलंदाजी करताना 2.924 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 139.24 राहिला आहे. आयपीएलमध्ये त्याने 13 अर्धशतकांसह 1 शतक झळकावले आहे. आयपीएलमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 101 राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जेसन गिलेस्पीची होणार सुट्टी? पाकिस्तानला मिळणार नवा मुख्य प्रशिक्षक
“मला ऑस्ट्रेलियात विराटचे कसोटी शतक पाहायचे आहे” ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य!
BGT; दुखापतीबद्दल केएल राहुलचे मोठे वक्तव्य म्हणाला, “पहिल्या कसोटीसाठी मी….”