क्रिडाजगतात फुटबॉल, टेनिस, हॉकी अशा खेळांसह क्रिकेटही खूप प्रसिद्ध आहे. एकाहून एक जबरदस्त फटकेबाजी करणारे फलंदाज, वेगवेगळ्या पद्धतीने गोलंदाजी करत अप्रतिम विकेट घेणारे गोलंदाज, यष्टीमागे अविश्वसनीय कामगिरी करणारे यष्टीरक्षक, मोठमोठ्या डाइव्ह घेत भन्नाट झेल पकडणारे क्षेत्ररक्षक या सर्वांमुळे क्रिकेट पाहण्याचा मोह कुणालाही आवरत नाही.
अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट सामन्यांना नव्हे तर स्थानिक पातळीवर होणाऱ्या छोट्या-मोठ्या क्रिकेट स्पर्धांना पाहण्यासाठीही लोक गर्दी करतात. त्यातही एखादा गडी प्रभावी कामगिरी करू लागला की, त्याची दिग्गज क्रिकेपटूंसोबत तुलना केली जाते. सध्या ट्विटरवर अशाच एका प्रतिभाशाली खेळाडूच्या व्हिडिओची चर्चा रंगली आहे.
हा खेळाडू एका क्रिकेट स्पर्धेदरम्यान मैदानाच्या चोहोबाजूंना मोठमोठे शॉट मारताना दिसत आहे. त्याच्या फटकेबाजीपुढे ते क्रिकेटचे मैदान छोटे पडल्यासारखे भासत आहे. केवळ गोलंदाज नव्हे तर यष्टीरक्षकासह विरोधी संघातील इतर आणि पंचदेखील त्याची फलंदाजी पाहून अवाक् झाल्याचे दिसत आहेत. हा विस्फोटक फलंदाज १९ वर्षांखालील दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू डेवल्ड ब्रेविस आहे.
Introducing South African U19 star Dewald Brevis – the next @ABdeVilliers17? ????????
[via @PitchVisionSA, h/t @BlaqsInCricket, @lue_balo] pic.twitter.com/Rw2m2SezwD
— Cricket District (@cricketdistrict) February 11, 2021
For one moment I thought its the younger version of Kevin Peterson ???? @KP24 have a look sir
— Abhinav Jain ❤???????? (@abhi31jain) February 11, 2021
https://twitter.com/QontemporaryMan/status/1359812952573022209?s=20
The first and only Dewald Brevis????
— Mo Sauleh (@MSauleh17) February 11, 2021
AB
— Abhinav (@Abhisayss) February 11, 2021
Watch him win the 2027 World Cup for England
*pain*
— Dan Cricket (@DanCricket93) February 11, 2021
नेटकऱ्यांनी ब्रेविसच्या फलंदाजीला पाहून त्याची क्रिकेटविश्वातील कित्येक धाकड फलंदाजांसोबत तुलना केली आहे. काहींनी तो दक्षिण आफ्रिकाचा स्टार फलंदाज एबी डिविलियर्स सारखा फलंदाजी करत असल्याचे सांगितले आहे. तर काहींनी त्याच्यात इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन यांच्या युवा वयातील फलंदाजीची झलक दिसल्याचे म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दुसर्या कसोटीतून रोहित, रहाणेसह ‘हा’ खेळाडू होणार ‘आउट’? कर्णधार कोहली कठोर निर्णय घेण्याची शक्यता
बिग ब्रेकिंग! भारताविरुद्धच्या आगामी टी२० मालिकेसाठी १६ सदस्यीय इंग्लंड संघाची घोषणा