---Advertisement---

WTC फायनलसाठी दक्षिण आफ्रिकेच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा…!!!

On: मंगळवार, जून 10, 2025 7:30 PM
---Advertisement---

South Africa’s playing XI announced for the WTC final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल (WTC Final) सामना बुधवार, 11 जूनपासून दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाईल. हा जेतेपदाचा सामना इंग्लंडमधील लॉर्ड्स येथे खेळला जाईल. या फायनल सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे.

जेतेपदाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसाठी रायन रिकेल्टन आणि एडेन मार्करम डावाची सुरुवात करतील. कर्णधार टेम्बा बावुमा तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. यानंतर, ट्रिस्टन स्टब्स चौथ्या क्रमांकावर आणि त्यानंतर डेव्हिड बेडिंगहॅम पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसेल. यष्टीरक्षक काइल व्हेरिन सहाव्या क्रमांकावर येईल. सातव्या आणि आठव्या क्रमांकावर 2 अष्टपैलू खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.

प्रथम वियान मुल्डर येईल, जो मध्यमगती गोलंदाजी करतो तसेच चांगली फलंदाजी करतो. त्यानंतर आठव्या क्रमांकावर वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू मार्को जॅन्सेन दिसेल. जॅनसेन डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज तसेच एक चांगला फलंदाज आहे.

फिरकी विभाग केशव महाराजच्या हातात आहे. खेळपट्टीनुसार, अंतिम अकरामध्ये फक्त एका फिरकी गोलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, दोन मुख्य वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी आणि कागिसो रबाडा आहेत. दोघेही घातक गोलंदाजीसाठी ओळखले जातात.

डब्ल्यूटीसी फायनलसाठी दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन- रायन रिकेलटन, एडेन मार्करम, टेम्बा बावुमा (कर्णधार), वियान मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल व्हेरिन (यष्टीरक्षक), मार्को जॅन्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी

ऑस्ट्रेलियन संघ – उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मॅरेनस लाबुशाने, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, अॅलेक्स केरी, जोश इंग्लिस, कॅमेरॉन ग्रीन, ब्यू वेबस्टर, पॅट कमिन्स (कर्णधार), मिशेल स्टार्क, जोश हेझलवुड, स्कॉट बोलंड, नॅथन लायन, मॅट कुहनेमन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---