---Advertisement---

रायली रूसोचा शतकी धमाका! 2022 टी20 विश्वचषकातील पहिला शतकवीर होण्याचा मिळवला मान

On: गुरूवार, ऑक्टोबर 27, 2022 10:46 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात गुरुवारी (27 ऑक्टोबर) पहिला सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश (SAvBAN) असा खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रायली रुसो (Rilee Rossouw) याने शानदार शतक झळकावत या विश्वचषकात पहिला शतकवीर होण्याचा मान मिळविला. यासोबतच त्याने सलग दुसऱ्या टी20 सामन्यात शतक झळकावण्याची कामगिरी केली.

 

झिम्बाब्वेविरूद्ध दुर्दैवीरित्या सामना रद्द करावा लागलेल्या दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात सुरुवात खराब केली. कर्णधार टेंबा बवुमा हा केवळ दोन धावा काढून माघारी परतला. मात्र, त्यानंतर क्विंटन डी कॉक व रायली रुसो यांनी बांगलादेशी गोलंदाजांची पिसे काढली. त्यांनी दुसऱ्या गड्यासाठी तब्बल 168 धावा जोडल्या. डी कॉक 38 चेंडूवर 63 धावा काढून माघारी परतला. मात्र, रूसोने आपली आक्रमक फलंदाजी तशीच सुरू ठेवली. त्याने 52 चेंडूंवर आपल्या टी20 कारकीर्दीतील दुसरे शतक झळकावले. हे त्याचे सलग दुसऱ्या सामन्यातील शतक ठरले. यापूर्वी भारत दौऱ्यावरील अखेरच्या सामन्यात इंदोर येथे त्याने शतकी खेळी केलेली. त्यानंतर विश्वचषकातील पहिल्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. बाद होण्यापूर्वी त्याने 56 चेंडूवर 7 चौकार व 8 षटकारांच्या मदतीने 109 धावा केल्या.

या सामन्याचा विचार केला गेल्यास दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार बवुमा केवळ दोन धावा काढून पहिल्याच षटकात माघारी परतला. त्यानंतर डी कॉक व रुसो यांनी धावगती अजिबात कमी न होऊ देता 85 चेंडूवर 168 धावा काढल्या. डी कॉकने 68 धावांचे योगदान दिले. रूसो शतक करून बाद झाला. मात्र, अखेरच्या चार षटकात बांगलादेशच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन करत दक्षिण आफ्रिकेला 205 धावांवर रोखले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

हार्दिक नेदरलँड्सविरूद्ध खेळणार का? गोलंदाजी प्रशिक्षकांनी स्वतः केला खुलासा

भारत-नेदरलँड्स सामन्यात पाऊस बनणार का खलनायक? असा असेल सिडनीचा मौसम 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---