दक्षिण आफ्रिका विरूद्ध पाकिस्तान (South Africa vs Pakistan) संघात कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना केपटाऊनमध्ये खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेकडून ‘रायन रिकेल्टन’ने (Ryan Rickelton) दमदार कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात फलंदाजी करताना शतक झळकावले आहे. दरम्यान त्याने 14 चौकार लगावले. वृत्त लिहेपर्यंत तो 105 धावा करून खेळत होता. आयपीएल फ्रँचायझी ‘मुंबई इंडियन्स’ने (Mumbai Indians) रिकेल्टनचे एक मनोरंजक पोस्टरही शेअर केले आहे.
वास्तविक, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान रिकेल्टनने आफ्रिकेसाठी सलामी दिली. त्याच्यासोबत एडन मार्करमही सलामीला आला होता. पण मार्करम 17 धावा करून तंबूत परतला. रिकेल्टन टिकून राहिला आणि त्याने दमदार कामगिरी करत शतक झळकावले. वृत्त लिहेपर्यंत रिकेल्टनने 148 चेंडूंचा सामना केला आणि 14 चौकारांच्या मदतीने 105 धावा केल्या.
रायन रिकेल्टनने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच पराभव केला. त्याच्यासोबत कॅप्टन टेंबा बवुमाही खेळपट्टीवर टिकून राहिला. बवुमाने शानदार अर्धशतक झळकावले. वृत्त लिहेपर्यंत त्याने 88 चेंडूंचा सामना करत नाबाद 51 धावा केल्या. दरम्यान त्याने 6 चौकार मारले. बवुमा आणि रिकेल्टन यांच्यात चांगली भागीदारी होती. वृत्त लिहिपर्यंत दक्षिण आफ्रिकेने 184 धावा केल्या होत्या. तर 3 विकेट्स देखील गमावल्या होत्या.
2025च्या आयपीएल मेगा लिलावात (IPL Mega Auction 2025) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) ‘रायन रिकेल्टन’ला (Ryan Rickelton) त्याच्या मूळ किमतीत (1 कोटी) आपल्या ताफ्यात सामील केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शर्माला ड्रॉप केल्यामुळे भावूक झाला रिषभ पंत; म्हणाला, “हा असा निर्णय…”
SA vs PAK; पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूला गंभीर दुखापत, स्ट्रेचरच्या मदतीने गेला बाहेर
जसप्रीत बुमराहवर कामाचा ताण वाढतोय, मालिकेत आतापर्यंत टाकले इतके चेंडू; आकडा धक्कादायक!