प्रथमच आयोजित होत असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील पाच दिवसांचा खेळ संपन्न झाला आहे. मात्र, दोन दिवस पावसामुळे खेळ झाला नसल्याने बुधवारी (२३ जून) राखीव दिवशी सामन्याचा निकाल लागू शकतो. पाचव्या दिवशी संपूर्ण दिवस खेळ अत्यंत उत्कंठावर्धक झाला. भारताच्या दुसऱ्या डावात अनुभवी रोहित शर्माला बाद करणाऱ्या टिम साऊदीने रोहितविरुद्ध आपले वर्चस्व कायम ठेवले.
रोहित बनला साऊदीचा बळी
भारतीय संघाच्या दुसर्या डावात शुबमन गिल व रोहित शर्मा संघाला चांगली सलामी देऊ शकले नाहीत. संघाच्या २४ धावा झाल्या असताना अनुभवी टिम साऊदीने गिलला पायचीत पकडले. त्यानंतर, रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव पुढे नेला. दिवसाचा खेळ संपण्यासाठी ४ षटके शिल्लक असताना, साऊदीने जम बसलेल्या रोहित शर्माला एका अप्रतिम चेंडूवर पायचीत केले.
साऊदी गाजवतो रोहितवर वर्चस्व
न्यूझीलंडचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज असलेला टिम साऊदी रोहित शर्मावर नेहमी वर्चस्व गाजवताना दिसून येतो. त्याने आत्तापर्यंत रोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा म्हणजे १० वेळा बाद करण्याचा कारनामा केला आहे. त्यापैकी तीन वेळा टी२०, पाच वेळा वनडे व दोन वेळा कसोटीमध्ये तो रोहित शर्माला बाद करण्यात यशस्वी झाला.
या गोलंदाजांची नेहमीची शिकार आहे रोहित
टिम साऊदीव्यतिरिक्त श्रीलंकेचा वरिष्ठ खेळाडू अँजेलो मॅथ्यूज याने देखील रोहितला आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० वेळा बाद करण्यात यश मिळवले. या यादीमध्ये तिसरा क्रमांक दक्षिण आफ्रिकेच्या कगिसो रबाडा याचा लागतो. त्याने रोहितला ९ वेळा तंबूचा रस्ता दाखवला आहे. दक्षिण आफ्रिकेतच मॉर्नी मॉर्कल व न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट यांनीदेखील रोहितला प्रत्येकी सात वेळा बाद केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
चतुर पंत! भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या टीम साऊदीला असं ओढलं फिरकीच्या जाळ्यात
विराटच्या नेतृत्वात आर अश्विनने केली उल्लेखनीय कामगिरी, ‘या’ यादीत पोहोचला दुसऱ्या स्थानी
केन विलियम्सनचं अर्धशतक हुकलं, पण स्टिफन फ्लेमिंगला मागे टाकत केला ‘मोठा’ विक्रम