इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या द हंड्रेड या व्यावसायिक क्रिकेट लीगचे अंतिम सामने रविवारी (27 ऑगस्ट) खेळले गेले. लॉर्ड्स येथे झालेल्या महिलांच्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात सदर्न ब्रेव्हज आणि नॉदर्न सुपरचार्जर्स हे संघ आमने-सामने आले होते. सदर्न ब्रेव्हज संघाने उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर 35 धावांनी विजय मिळवत अजिंक्यपद पटकावले. भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना ही या संघाची सदस्य आहे. इंग्लंडची दिग्गज खेळाडू व सदर्न ब्रेव्हजची कर्णधार ऍना श्रबशोल हिच्या कारकिर्दीची विजयी अखेर झाली.
(Southern Braves Won The Hundred Womens Ana Shrubsole Retired)
महत्वाच्या बातम्या –
कॅलिसचा क्लास 47 व्या वर्षीही कायम! 22 चेंडूवर ठोकले वादळी अर्धशतक, पाहा व्हिडिओ
अहमदाबादमध्ये होणार वर्ल्डकपचा उद्घाटन सोहळा, जाणून घ्या ‘या’ खास गोष्टी