न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलमने २०१२ ला रॉस टेलरबरोबर झालल्या वादाबद्दल भाष्य करताना म्हटले आहे की त्यामुळे त्यांच्या मैत्रीच्या नात्याला धक्का लागला. तसेच मॅक्यूलमने म्हटले आहे की ती घटना न्यूझीलंड क्रिकेटवरील एक काळा डाग आहे.
याबद्दल स्काय स्पोर्ट्सशी बोलताना मॅक्यूलम म्हणाला, ‘त्या काळातून जाणे आणि त्या काळात मैत्री टिकून रहाणे कठिण होते.’
२०१२ ला न्यूझीलंडने श्रीलंकेचा दौरा केला होता. त्या दौऱ्यातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने टेलरच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली होती. ही कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत संपली. पण त्यानंतर टेलरने कर्णधारपदाचा राजीनामा दिला.
मॅक्यूलमने असाही खूलासा केला की दोघांनीही या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान व्यावसायिक राहण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी मीडियामध्ये अशी चर्चा होती की मॅक्यूलम आणि त्यावेळीचे प्रशिक्षक माईक हेसन यांनी टेलरला कर्णधारपदावरुन काढून टाकण्याचा प्रयत्न केला.
याबद्दल मॅक्यूलम म्हणाला, ते सर्व प्रकरण चांगल्या स्वरुपात हातळले गेले नाही. कर्णधारपदाचे विभाजन करण्यास टेलर तयार नव्हता. तो त्यावेळी कसोटी संघाचा कर्णधार राहू शकला असता. त्यानंतर मॅक्यूलम न्यूझीलंडचा तीन्ही क्रिकेट प्रकारात कर्णधार झाला.
मॅक्यूलम म्हणाला, ‘मला न्यूझीलंडचे तीन्ही प्रकारच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व देण्यात आहे आणि मी माझ्या पत्नीशी चर्चा केल्यानंतर ते स्विकारले.
मॅक्यूलमच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने २०१४-२०१५मध्ये चांगली कामगिरी केली. त्यांनी २०१५ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातही धडक मारली. मात्र त्यावेळी त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्विकारावा लागला. याबद्दल मॅक्यूलम म्हणाला, त्याच्या कारकिर्दीतील ते सर्वोच्च शिखर होते.
तो म्हणाला, ‘मला वाटते आम्ही एक संघ म्हणून विश्वचषक जिंकू शकत होतो. माझा विश्वास आहे की विश्वचषक खेळण्याचा दबाव झेलण्याची क्षमता आमच्या संघात होती.’
ट्रेंडिंग घडामोडी-
–आधी चुकला असला तरी या ३ कारणांमुळे उनाडकटला टीम इंडियात दिली पाहिजे संधी
–यावरुन कळते गांगुली टीम इंडियासाठी किती कष्ट घेत आहे
-दक्षिण आफ्रिकेचा स्टार डेल स्टेन पाकिस्तानच्या हाॅटेलमध्ये होता अरेस्ट