राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात दिल्ली येथे रविवारी (०२ मे) आयपीएल २०२१ चा २८ वा सामना झाला. या सामन्याद्वारे एका युवा शिलेदाराचे आयपीएल पदार्पण झाले. हा खेळाडू म्हणजे, ‘अनुज रावत’. राजस्थान संघाचा फलंदाज शिवम दुबे याला वगळत अनुजला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे.
ऑक्टोबर १७, १९९९ रोजी उत्तराखंडच्या रामनगरमध्ये अनुजचा जन्म झाला होता. २० वर्षीय अनुजने अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदापर्ण केलेले नाही. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने आपली छाप पाडली आहे.
अनुजची आकडेवारी पाहिली तर, एक गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे, अनुज क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात दमदार प्रदर्शन करु शकतो. त्याने आतापर्यंत दिल्लीकडून १९ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने २ शतके आणि ३ अर्धशतके ठोकत ९२५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या सर्वाधिक १३४ धांवाचाही समावेश आहे.
तर, अ दर्जाच्या आणि देशांतर्गत स्तरावरील टी२० क्रिकेटमध्ये खेळल्यामुळे त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटचाही अनुभव आहे. त्याची अ दर्जाच्या क्रिकेटमधील फलंदाजी सरासरी ३५.७१ इतकी आहे तर टी२० क्रिकेटमधील २६.११ इतकी आहे.
अनुजची चपळता हे त्याचे वैशिष्ट्य आहे. यष्टीमागे त्याचे हात खूप वेगाने चालतात. त्यामुळे त्याच्या यष्टीरक्षणाची तुलना भारताचा माजी यष्टीरक्षक एमएस धोनीबरोबर केली जाते.
आयपीएल २०२० लिलावात अनुजला विकत घेण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये कडी टक्कर झाली होती. सुरुवातीला फ्रंचायझींनी अनुजसाठी बेसिक २० लाख रुपयांपासून सुरुवात केली होती. पुढे त्याची बोली वाढत गेली आणि अखेर राजस्थान रॉयल्सने त्याला ८० लाख रुपयांना विकत घेतले. त्यामुळे आपल्याला मिळालेल्या संधीला तो हाताने घट्ट पकडत आपले स्थान पक्के करण्याचा प्रयत्न करेल.
.@AnujRawat_1755 is all set to make his #VIVOIPL debut 👏👏 #RRvSRH pic.twitter.com/ZaorKs8ZWY
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2021
विशेष म्हणजे, अनुजची क्रिकेट कारकिर्द घडवण्यात भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरचा मोठा हात आहे. गंभीरमुळे त्याला दिल्ली क्रिकेट संघाकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. एवढेच नव्हे तर, गंभीरने अनुजला स्लिपमध्ये उभे राहून यष्टीरक्षणाचे टिप्सदेखील दिले आहेत.
गंभीरने अनुजला सल्ला दिला होता की, “जेव्हा एखादा यष्टीरक्षक पुढील गोलंदाजाला चांगल्याप्रकारे समजून घेऊ शकत नाही, तेव्हापर्यंत तो यष्टीमागे एकही चेंडू पकडू शकणार नाही.” गंभीरच्या या सल्ल्यामुळे अनुजला एक उत्कृष्ट यष्टीरक्षक बनण्यात मदत झाली.
महत्त्वाच्या बातम्या-
नाणेफेकीचा कौल नव्या कर्णधाराच्या पारड्यात, वॉर्नरला डच्चू देत ‘असे’ आहेत राजस्थान-हैदराबाद संघ