यंदाच्या आयपीएलमध्ये एक नवा अवॉर्ड सुरू केला गेलाय फास्टेस्ट डिलीव्हरी ऑफ द मॅच. मॅचमध्ये सगळ्यात फास्ट बॉल टाकणाऱ्या बॉलरला एक लाखाच प्राईस मिळतंय. या अवॉर्डवर आतापर्यंत ज्याने सातत्याने आपला हक्क सांगितलाय तो बॉलर म्हणजे सनरायझर्स हैदराबादचा तेजतर्रार आणि खऱ्या अर्थानं फास्ट बॉलर म्हणता येईल अशा उमरान मलिक यानं. सनरायझर्स खेळलेल्या सहाही मॅचमध्ये ते एक लाख उमरानच्याच खात्यात जमा झालेत.
आता उमरान मलिक हे नाव क्रिकेटप्रेमींना नवं राहिल नाही. उमरान मलिक काय चीज आहे हे लास्ट सिझनच्या शेवटी दिसलेल. दोन मॅच खेळूनच त्यान आपल्या स्पीडने साऱ्यांना वेड लावलेल. गेल्यावर्षी तो सनरायझर्सच्या कॅम्पमध्ये आला नेट बॉलर म्हणून. नेटमध्येच बेअरस्टो, विलियम्सन, केदार जाधव या इंटरनॅशनल प्लेअरला त्याने घाम फोडला. नशीब त्याच्या बाजूने होतं आणि नटराजन कोविड झाल्यामुळे स्पर्धेतून बाहेर झाला. लास्ट दोन मॅचसाठी तो सनरायझर्सच्या टीममध्ये आला आणि प्रत्येक बॉल १४५ च्या पुढे टाकला. १५२ पेक्षा जास्तचा फास्टेस्ट बॉल. असा बॉलर इंडियाने कधी पाहिला नव्हता, पण त्याचा इथपर्यंतचा प्रवास काही सोपा राहिला नव्हता.
उमरान अवघ्या २२ वर्षाचा. जम्मू-काश्मीरचा. त्याच्या जन्माच्या कितीतरी दशकां आधीपासून काश्मीर खोर रोज जळतंय. अशात इथली पोरं क्रिकेट खेळून थोडीफार शांतता मिळवतात. काश्मीरमध्ये नाईटच्या टेनिस बॉल क्रिकेटच भारी फॅड. पंधरा सोळा वर्षाचा उमरान तिथेच टेनिस बॉलन वाऱ्यासारख स्पीड काढायचा. अशीच एका अंडर नाईन्टीन सिलेक्टरची नजर त्याच्यावर पडली आणि त्याने त्याला ट्रायलसाठी बोलावले. पहिल्यांदाच लेदर बॉल टाकताना त्याने शूज पण तिथल्याच एका जोडीदाराचे घातलेले. त्याचा स्पीड चांगला होता पण तो डिस्ट्रिक लेवल खेळला नव्हता त्यामुळे त्याला सिलेक्ट केले गेले नाही. त्याने हार मानली नाही आणि तो पुन्हा ट्रायलसाठी गेला. इथं मात्र दुसर्या सेलेक्टरने सरळ शब्दात सांगितले, “डिस्ट्रिक्ट लेवल वगैरे विसर तू डायरेक्ट अंडर १९ खेळणारेस.”
हेही पाहा- उमरान मलिकच्या स्पीडनं लोक वेडी व्हायची राहिलीत
नेमकं त्याचवेळी इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाण जम्मू काश्मीर क्रिकेट टीमसोबत काम करत होता. त्याने उमरानला अंडर २३ आणि नंतर सीनियर टीममध्ये चान्स दिला. पुढे तो आयपीएलला आला. उमरानची आयपीएलमध्ये नेट बॉलर म्हणून यायची स्टोरी पण इंटरेस्टिंग आहे बर का.
सन २०२० आयपीएलमध्ये सनरायझर्सकडून जम्मू-काश्मीरचा अब्दुल समद गाजला. त्याचं नाव झालं. उमरान त्याचा एकदम खास दोस्त. आपला दोस्त किती टॅलेंटेड आहे हे समदला माहित होतं. त्याने आधी दिल्ली कॅपिटल्सला त्याला नेट बॉलर म्हणून घ्या अशी विनंती केली. कदाचित दिल्लीच्या स्काऊटला त्याला ओळखता आले नाही. समदने दोस्ती का फर्ज निभवायचाच असं मनाशी बांधलेल. त्याला सनरायझर्सच्या कॅम्पमध्ये नेले. त्यांनी पण आधी नकारच दिला.. शेवटी पैसे देऊ नका पण खेळू द्या अशीच ऑफर उमरान अन् समदने दिली आणि पुढे घडलेला इतिहास आहे.
पुढे २०२१च्या दोन मॅचनंतर सनरायझर्स मॅनेजमेंट त्याच्यावर इतका खूप झालं की, भलेभले दिग्गज रिलीज करत केन विलियम्सन, अब्दुल समदसोबत उमरान मलिकला चार कोटी देत त्यांनी रिटेन केले. सीझनच्या पहिल्या दोन-तीन मॅचला त्याचा तोच स्पीड दिसला पण लेंथ काय सापडली नाही, पण केकेआरविरुद्ध ती मॅच आली. ज्यात त्याने श्रेयस अय्यरचा असा काही बोल्ड उडवला की, डग आऊटमध्ये बसलेला कोच डेल स्टेनला वाटलं मीच बोल्ड मारलाय. भल्याभल्यांना घाम फोडणारा आंद्रे रसेल त्याला त्या मॅचमध्ये टरकला. पुढच्या मॅचला तर तो आणखीच घातक बनला आणि पंजाबविरुद्ध त्याने लास्ट ओव्हर मेडन टाकली. ती पण तीन विकेट घेऊन. नेहमीच भारतीय क्रिकेटच्या नावाने नाक मुरडणारे, केविन पीटरसन अन् मायकल वॉन हे इंग्लिशमन उमरान बॉलिंगचा आला की, रॉकेटची ट्विट्स करतात.
सनरायझर्स मॅनेजमेंटने त्याला सांगून ठेवलय तू रन किती देतो याला महत्त्व नाही. तू फक्त स्पीडने बॉल टाकायचाय. १५० किमीच्या स्पीडने बॉल टाकणारा दुसरा बॉलर सध्या आपल्याकडे शोधून सापडायचा नाही. त्यामुळे त्याला जपायचं काम ही सगळी मंडळी करतायेत. उमरानने जस त्याच्या इंस्टाग्राम बायोमध्ये लिहिलय ‘इंडिया सून’ हे स्वप्न पूर्ण करायला त्याच्यासोबतच अनेक दृश्य अदृश्य हात धडपडतायेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सलाम तुझ्या समर्पणाला! रक्तबंबाळ पाय घेऊन वॉटसन मुंबईला एकटा भिडलेला
मुंबई इंडियन्सला IPL 2022मध्ये मिळालाय ‘हिरा’, तो ‘बेबी एबी’ नाव सार्थ करणारंच!
रेल्वेत ‘गँगमन’ ते आयपीएल टीम्सचा ‘लकी चार्म’, वाचा एका दिवसात करोडपती बनलेल्या कर्णबद्दल