क्रिकेटच्या खेळात एकाच गोलंदाजाने दहाही बळी मिळवण्याचे काम किती विशेष असते, हे सर्वांना माहीत आहे. काही प्रमाणात ही बाब जवळ जवळ अशक्य आहे. असे असूनही, क्रिकेटविश्वात अनेक उत्तम खेळाडू आहेत ज्यांनी हा विलक्षण कारनामा करून दाखविला आहे. या खेळाडूंमध्ये भारताचे माजी दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे यांचाही समावेश होतो. पण आज आपण या लेखात अशा एका खेळाडूबद्दल माहिती बघणार आहोत, ज्याने एकाच सामन्यात केवळ 10 धावाही न देता 10 बळी मिळवले होते. त्या खेळाडूचे नाव आहे हेडली वेरीटी.
आज वेरीटी यांचा वाढदिवस आहे. हेडली वेरीटी यांचा जन्म 18 मे 1905 रोजी इंग्लंड या देशात झाला होता.
आपण ज्या ऐतिहासिक सामन्याबद्दल बोलत आहोत तो 1931 मध्ये हेडिंगली येथे खेळला गेला होता. हा सामना यॉर्कशायर आणि नॉटिंगहॅमशायर संघांमध्ये झाला होते. त्यावेळी वेरीटी हे यॉर्कशायर संघाचे खेळाडू होते आणि नॉटिंगहॅमशायर विरुद्धच्या या सामन्यात त्यांनी अवघ्या 10 धावांवर संपूर्ण संघाला बाद केले होते. आश्चर्यकारक बाब म्हणजे आतापर्यंत एका डावात दहा बळी घेतलेल्या सर्व कामगिरीपैकी हॅट्रिकचा समावेश असणारी ही केवळ एकमेव कामगिरी राहिली आहे.
विशेष म्हणजे, त्या वर्षीच्या स्पर्धेत वेरीटी यांनी या सामन्यापुर्वी वॉर्विकशायर विरुद्धही डावातील सर्व दहा बळी घेण्याचा कारनामा केला होता. वॉर्विकशायर विरुद्धच्या सामन्यात वेरीटी यांनी 36 धावांत 10 गडी बाद केले होते. वेरीटींची शानदार कामगिरी केवळ स्थानिक क्रिकेटपुरती मर्यादित नवती. त्यांनी 1934 झाली अॅशेस मालिकेदरम्यान लॉर्ड्सच्या कसोटी सामन्यात 104 धावा देऊन 15 बळीही मिळवले होते.
त्याहूनही आश्चर्यकारक बाब म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांना वेरीटी हे सर्वात जास्त वेळा बाद करणारे गोलंदाज राहिले आहेत. वेरीटी यांनी ब्रॅडमनला 8 वेळा बाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
सनरायझर्सची ‘वन मॅन आर्मी’ पुणेकर राहुल त्रिपाठी
जस्सी जैसा जस्सीच! टी२० च्या इतिहासात अशी कामगिरी करणारा बनला पहिला भारतीय
टीम डेव्हिडची वादळी खेळी व्यर्थ! मुंबईचा दहावा पराभव; हैदराबादचे आव्हान कायम