प्रो कबड्डीमध्ये पुणेरी पलटण यंदा विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. मागील सामन्यात यु मुंबाला पराभूत करून संघ पुणे येथे पोहचला आहे. पुढील सामन्यासाठी दहा दिवस विश्रांती असल्याने हा संघ पुणे येथील मानाच्या कसबा गणपतीच्या दर्शनासाठी आला होता. त्यावेळी या संघाचे मुख्य प्रशिक्षक बी. सी. रमेश यांनी महा स्पोर्ट्सशी संवाद साधला.
पुणेरी पलटणच्या मागील सामन्यातील कामगिरीवर प्रश्न विचारले असता ते म्हणाले, “यु मुबा विरुद्धच्या सामन्यात संघाने चांगला खेळ केले. शेवटच्या काही मिनिटात आमच्या संघाने विजयश्री खेचून आणला. गुजरात विरुद्ध झालेल्या पराभवाने खेळाडू थोडे निराश होते. परंतु यु मुबाविरुद्धच्या सामन्यातील विजयाने संघातील खेळाडू उत्साही झाले आहेत. गुजरात विरुद्ध शेवटच्या ३-४ मिनिटात आम्ही सामना गमावला. हा सामना आम्ही खूप मोठ्या फरकाने गमावला, हा सामना आम्ही कमी गुणाने गमवायला हवा होता.”
महाराष्ट्रातील एखाद्या नवीन खेळाडूंना पुढील सामन्यात तुम्ही संधी द्याल का? या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले,” संघात असणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंना आम्ही संधी देत आहोतच. पहिल्या काही सामन्यात जी. बी. मोरे याने संघासाठी उत्तम कामगिरी केली होती. गिरीश एर्नेक हा संघाचा महत्वाचा खेळाडू आहे.”
पुढील सामन्यातील संघाची रणनीती कशी असेल असे विचारले असता ते म्हणाले,” आमचा पुढील सामना तेलगू टायटन्स विरुद्ध आहे. आम्ही राहुल चौधरी याच्यासाठी विशेष रणनीती आखली आहे. तेलुगूचा दुसरा रेडर रोहित बलियान याच्यावर देखील आम्ही विशेष लक्ष केंद्रित करणार आहोत. पुढील सामन्यात आम्ही लेफ्ट रेडर आणि राइट रेडर यांचा सामन्यात कधी आणि किती उपयोग करायचा याचा आम्ही सध्या विचार करत आहोत.”
यावेळी आलेल्या चाहत्यांना पुणेरी पलटणच्या खेळाडूंनी सेल्फी काढण्यास मनाई केली नाही. संदीप नरवाल आणि दीपक निवास हुड्डा यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांमध्ये विशेष रस्सीखेच येथे पाहायला मिळाली.
@PuneriPaltan चे मुख्य प्रशिक्षक बी.सी. रमेश यांची महा स्पोर्ट्सने घेतलेली विशेष मुलाखत…!!! #ProKabadddi pic.twitter.com/6r88XUSZCv
— Maha Sports (@Maha_Sports) August 28, 2017
https://www.facebook.com/MaharashtraSports/videos/480338752324396/