---Advertisement---

चेन्नईकडून आयपीएलमध्ये पदार्पणात प्रभावी कामगिरी करणाऱ्या हंगरगेकरसाठी धाराशिवच्या आमदाराची खास पोस्ट, ‘आई तुळजाभवानी…’

On: शनिवार, एप्रिल 1, 2023 3:07 PM
Rajvardhan Hangargekar Tulja Bhawani
---Advertisement---

आयपीएलच्या 16व्या हंगामातील पहिला सामना गुजरात टायटन्सने जिंकला. पहिल्या सामन्यात गुजरातने एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जला 5 विकेट्स राखून मात दिली. चेन्नईने या सामन्यात पराभव स्वीकारला असला, तरी त्यांच्या खेळाडूंनी मैदानात जबरदस्त प्रदर्शन केले. मुळचा धाराशीवचा असणाऱ्या राजवर्धन हंगरगेकर यानेही आपली चमक दाखवली. हंगरगेकरणे आपल्या पदार्पणाच्या सामन्यात केलेल्या प्रदर्शनाची दखल तुळजापूर-धाराशीवचे आमदार राणा जगजीतसिंग पाटील यांनीही घेतली.

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात सीएसकेने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hungergekar) याला सामील केले. हंगरगेकरचा हा पहिलाच आयपीएल सामना होता आणि त्याने आपली गुणवत्ता दाखवून दिली. या सामन्यात हंगरगेकरने चार षटकात 36 धावा खर्च करत सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. पदार्पणाच्या सामन्यात प्रत्येक खेळाडू चांगले प्रदर्शन करू इच्छित असतो. पण अनेकांना तसे करता येत नाही. हंगरगेकरने मात्र आपले आयपीएल पदार्पण दिमाखात केले. याचसोबत हंगरगेकर धाराशीवमधून येणारा पहिलाच खेळाडू आहे, ज्याने आयपीएल खेळली. अशात धाराशीवच्या लोकप्रतिनिधींसाठीही देखील ही अभिमानाची बाब ठरत आहे. तुळजापूर-धाराशीवचे आमनदार राणा जगजीतसिंग पाटील (Rana Jagjit Singh Patil) यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावरून खास पोस्ट करून हंगरगेकरचे कौतुक केले.

https://twitter.com/ranajagjitsinh1/status/1641860015727476736?s=20

शुक्रवारी (31 मार्च) पार पडलेल्या या सामन्याचा विचार केला, तर सीएसकेने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. नाणेफेक जिंकून गुजरात जायंट्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर 20 षटकात सीएसकेने 7 बाद  178 धावा केल्या. यात सर्वोत मोठे योगदान राहिले सलामीवीर ऋतुराज गायकवाड याचे. पुणेकर ऋतुराजने अवघ्या 50 चेंडूत 4 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 92 धावा कुटल्या. गुजरातसाठी मोहम्मद शमी, राशिद खान आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी दोन-दो विकेट्स घेतल्या. तर जोस लिटल याला एक विकेट मिळाली.

प्रत्युत्तरात गुजरात फलंदाजीला आल्यानंतर सलामीवीर शुबमन गिल याने 36 चेंडूत 63 धावांची खेळी केली. मामध्ये 6 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. चेन्नईच्या गोलंदाजी आक्रमाणाकडून हंगरगेकरने 3 विकेट्स घेतल्या. तर दुशार देशपांडे, मिचेल सॅटनर आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली. (Special tweet of Dharashiv MLA Rana Jagjit Singh Patil after performing well in the first IPL match)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हेड-टू-हेड आकडेवारी, संभावित प्लेइंग 11 आणि मॅच प्रेडिक्शन, जाणून घ्या पंजाब-केकेआरच्या सामन्याविषीय सर्वकाही
ऋतुराजच्या वादळी 92 धावांची झुंज अपयशी, गुजरातचा पहिल्या सामन्यात दणदणीत विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---