जस भारतात मुंबईच्या फॅन्स समोर क्रिकेट खेळण्यात एक वेगळीच मजा असते तशी जगात इंग्लंडच्या क्रिकेट फॅन्स समोर अगदी लोकल ते आंतरराष्ट्रीय कोणत्याही प्रकारच क्रिकेट खेळण्यात क्रिकेटपटूंना आनंद मिळतो.
त्यातही ते क्रिकेट जर मर्यादित षटकांच आणि त्यातही २०-२० असेल तर मजा काही औरच. इंग्लंडमध्ये सध्या नेटवेस्ट टी२० ब्लास्टची जोरदार चर्चा सुरु आहे. कधी नाही ते यातील वेगवेगळ्या गोष्टींमुळे संपूर्ण जगातून या स्पर्धेला प्रसिद्धी मिळत आहे. रोज नवनवीन विडिओ व्हायरल होत आहे.
आता असाच एक विडिओ व्हायरल झाला आहे. एका चांगल्या आणि सुंदर कॅमेरामॅन हे खास दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे. हे दृश्य इतकं सुंदर होत की त्यासाठी समालोचक सुद्धा जागेवरून उभे राहून टाळ्या वाजवत होते.
एक नोकरी करणाऱ्या वर्गातील क्रिकेट चाहता स्टेडियममध्ये सामना पाहत असताना त्याच्या डाव्या हातात बिअर ग्लास असतो तेवढ्यात एक फलंदाजाने भिरकावलेला चेंडू त्याच्याकडे येतो. हा चाहताही आपल्या उजव्या हाताने आरामात हा सुंदर झेल पकडतो. ही सगळी घटना सामन्याच्या सहाव्या षटकात घडली. एका हातात बिअरचा ग्लास असताना अंदाजे ६०-७०मीटरवरून आलेला थेट चेंडू दुसऱ्या हाताने पकडणे नक्कीच सोपे नाही.
Crowd catch hero, we salute you!
He didn't spill a drop 🍻 👏 pic.twitter.com/y2HZbXGaTL
— Vitality Blast (@VitalityBlast) July 16, 2017