भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याला विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी अखेरच्या क्षणी 15 सदस्यीय संघात सामील केले. खरं तर, अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघात त्याची वर्णी लागली. भारताकडून 115 वनडे सामने खेळणाऱ्या 37 वर्षीय अश्विनसाठी वनडे क्रिकेटची मागील काही वर्षे चढ-उताराची राहिली आहेत. 2021 आणि 2022च्या टी20 विश्वचषकानंतर त्याला अखेरच्या टप्प्यात भारताच्या संघात जागा मिळाली होती. वॉशिंग्टन सुंदर याच्याकडे दुर्लक्षित करत मागील 6 वर्षात फक्त 4 वनडे सामने खेळणाऱ्या अश्विनला संधी मिळाल्यामुळे सर्वत्र चर्चा रंगली आहे. अशातच आता भारताच्या माजी खेळाडूने अश्विनवर मूर्ख आणि अनफिट अशा शब्दांचा हल्ला केला आहे.
लक्ष्मण शिवरामकृष्णन (Laxman Sivaramakrishnan) यांनी 30 सप्टेंबर रोजी एक्स (ट्वीट) करत आर अश्विन (R Ashwin) याच्यावर हल्लाबोल सुरू केला. 58 वर्षीय लक्ष्मण यांच्या मते, अश्विन फक्त यामुळे भारतात एवढे विकेट्स घेऊ शकला, कारण इथल्या खेळपट्ट्यांना त्याच्याप्रमाणे करण्यासाठी त्यात छेडछाड केली जाते.
या वादाला सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा लक्ष्मण यांनी विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेसाठी घोषित केलेल्या समालोचकांवर टीका करत ट्वीट केले. त्यांच्या मते, समालोचन पॅनेलमध्ये एकही दिग्गज फिरकीपटू नाहीये. अशात भारतात होणाऱ्या या विश्वचषकाचे विश्लेषण कसे करतील.
या चर्चांना तेव्हा सुरुवात झाली, जेव्हा लक्ष्मण म्हणू लागले की, भारतात खेळपट्ट्या सपाट तयार केल्या जातात. कारण, भारतीय फलंदाज फिरकीचा सामना करू शकत नाहीत. त्यानंतर ते म्हणाले की, “भारतीय फलंदाज फिरकीविरुद्ध यासाठी संघर्ष करत आहेत. कारण, भारतात खेळपट्ट्या कसोटी सामन्यांमध्ये अश्विनसाठी तयार केल्या जातात. सेना (Sena) देशातील त्याची आकडेवारी पाहा.”
यावेळी एकाने अश्विनच्या एका चाहत्याने तर्क देत म्हटले की, अश्विन कमीत कमी लक्ष्मण यांच्यापेक्षा चांगला फिरकीपटू आहे. यावर त्यांनी उत्तर देत म्हटले की, “कोणत्याही मूर्खाला भारतात छेडछाड होणाऱ्या खेळपट्ट्यांवर विकेट मिळेल.”
त्यांनी ट्वीट करत लिहिले की, “विमानतळावरून थेट मैदानावर जावा आणि ग्राऊंड स्टाफला सांगा की, कोणत्या खेळपट्टीच्या कोणत्या भागात छेडछाड करायची आहे, मी अनेकदा आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे.”
ते एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी अश्विनचे वर्णन ‘अनफिट’ आणि ‘ओझे क्षेत्ररक्षक’ असे केले. यानंतर काही तासांनी लक्ष्मण यांनी आणखी एक ट्वीट करत सांगितले की, त्यांना अश्विनचा फोन आला होता. त्यांनी लिहिले की, “रवि अश्विनने आताच काही वेळापूर्वी मला फोन करत आपल्या गोलंदाजी ऍक्शनविषयी चर्चा करण्यासाठी बोलावले होते. तोही ट्रोलर्सच्या टीकेमुळे तितकाच हैराण होता, जितका मी होतो. हेही स्पष्ट केले की, यामध्ये सामील लोक कोणत्याही प्रकारे त्यांच्याशी जोडले गेले नाहीयेत. खूप खूप शुभेच्छा अश्विन.”
लक्ष्मण यांची कारकीर्द
लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी भारतासाठी 1983 ते 1987 दरम्यान फक्त 9 कसोटी खेळताना 26 विकेट्स घेतल्या. तसेच, 16 वनडे सामने खेळताना 15 विकेट्स घेतल्या. तेदेखील आर अश्विन याच्याप्रमाणे तमिळनाडूची राजधानी चेन्नईचे आहेत. आपल्या काळातील जबरदस्त गुगली गोलंदाज राहिलेल्या लक्ष्मण यांनी वेळेपूर्वी क्रिकेट कारकीर्द संपल्यानंतर समालोचक म्हणूनही काम केले. (spinner ravichandran ashwin calls laxman sivaramakrishnan after ex indian cricketer critic posts on social media)
हेही वाचा-
‘भारताविरुद्ध खेळताना पाकिस्तानी खेळाडू घाबरतात…’, PAK दिग्गजाचे त्याच्याच देशाबद्दल खळबळजनक विधान
‘या’ दोघांना विश्वचषकात संधी मिळणं खूपच कठीण, सेहवागने नावासहित कारणही टाकलं सांगून






