---Advertisement---

CSK vs PBKS: फिरकीचा जादूगर! चहलने हॅट्रिक घेत आयपीएलमध्ये रचला इतिहास

On: बुधवार, एप्रिल 30, 2025 10:35 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 मधील 49वा सामना आज (30 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध पंजाब किंग्ज (CSK vs PBKS) संघात खेळला गेला. या सामन्यात पंजाबचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहलची जादू पाहायला मिळाली. चेन्नईविरूद्ध 19वे षटक टाकत असताना चहलने आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्यांदा हॅट्रिक घेतली. (Yuzvendra Chahal Hat-tric Against Chennai)

पंजाबकडून चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळताना, सामन्यात अशा वेळी हॅट्रिक घेतली जेव्हा चेन्नईचा संघ मोठ्या धावसंख्येसाठी खूप पुढे गेला आहे असे वाटत होते. पण युजवेंद्र चहलने चेन्नईविरूद्ध हॅट्रिक घेऊन अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली. त्याने 19व्या षटकात 4 विकेट्स आपल्या नावावर केल्या.

4 विकेट्स व्यतिरिक्त, चहलने त्याच्या शेवटच्या 3 चेंडूंवर चेन्नईच्या 3 फलंदाजांना शिकार केले. चहलची हॅटट्रिकची सुरुवात दीपक हुडाच्या विकेटने झाली. त्याने चौथ्या चेंडूवर ही विकेट घेतली. त्यानंतर, चहलने पाचव्या चेंडूवर अंशुल कंबोजला बोल्ड करून त्याला बाद केले. नूर अहमद चहलच्या हॅट्रिकचा तिसरा बळी ठरला, तो नूर मार्को जॅनसेच्या हातात झेलबाद झाला. हॅटट्रिकशिवाय, या षटकात त्याने महेंद्रसिंग धोनीची देखील विकेट घेतली.

आयपीएलमध्ये सर्वाधिक हॅट्रिक घेणारे गोलंदाज-
अमित मिश्रा – 3 वेळा (2008, 2011 आणि 2013)
युवराज सिंग – 2 वेळा (2009)
युजवेंद्र चहल – 2 वेळा (2022, 2025)

पंजाब किंग्जकडून हॅटट्रिक घेणारे गोलंदाज-
2- युवराज सिंग
1- अक्षर पाटे
1- सॅम करन
1- युजवेंद्र चहल*

आयपीएलमध्ये एका षटकात 4 विकेट्स घेणारे गोलंदाज-

अमित मिश्रा- हैदराबादविरूद्ध विरुद्ध पुणे वाॅरियर्स, पुणे 2013
युजवेंद्र चहल- राजस्थान विरुद्ध कोलकता, ब्रेबॉर्न 2022
आंद्रे रसेल- कोलकाता विरुद्ध गुजरात, नवी मुंबई 2022
युजवेंद्र चहल- पंजाब विरुद्ध चेन्नई, चेन्नई 2025

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---