अॅडलेड। ओव्हल मैदानावर झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये भारताने 31 धावांनी विजय मिळवला आहे. यामुळे भारत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0ने आघाडीवर आहे.
या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतने अनेक विक्रम केले. त्याने या सामन्यात यष्टीमागे 11 झेल घेण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे तो 11 झेल घेणारा पहिलाच भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे.
एका कसोटी सामन्यात यष्टीमागे 11 झेल घेण्याचा पराक्रम याआधी जॅक रसेल आणि एबी डेविलियर्स यांनी केला आहे. त्यामुळे आता पंतनेही त्यांच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे.
मात्र फलंदाज म्हणून पंतने साजेशी कामगिरी केली नाही. पण 2018मध्ये कसोटी सामन्यात सर्वाधिक षटकार मारणाऱ्यामध्ये तो सयुंक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच या सामन्यात त्याने दोन षटकार मारले असून त्याचे एकूण 14 षटकार झाले आहे. तर इंग्लंडच्या सॅम करननेही कसोटीमध्ये 14 षटकार खेचले आहे.
पहिल्या क्रमांकावर विंडीजचा शिमरॉन हेटमेयर आहे. त्याने आतापर्यत 2018 मध्ये 17 षटकार मारले आहे. याच्यापुढे जाण्याची संधी पंतला आहे. कारण त्याला अजून यावर्षात दोन कसोटी सामने खेळायचे आहेत.
पंत हा यष्टीरक्षक म्हणून एका कसोटी सामन्यात 10 किंवा त्यापेक्षा जास्त झेल घेणारा जगातील 6 वा यष्टीरक्षक ठरला आहे. याआधी जॅक रसेल, एबी डेविलियर्स, बॉब टेलर, अॅडम गिलख्रिस्ट आणि वृद्धिमान साहा यांनी हा विक्रम केला आहे.
2018 वर्षात कसोटीमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू:
17 – शिमरॉन हेटमेयर
14 – रिषभ पंत
14 – सॅम करन
9 – कुशल मेंडीस
महत्त्वाच्या बातम्या:
–अॅडलेड कसोटीत यष्टीरक्षक रिषभ पंत चमकला, केले हे खास विक्रम
–भारतीय क्रिकेटरने केलेलं असलं स्लेजिंग तुम्ही यापुर्वी कधीही पाहिलं नसेल
–माझ्या जीवनात मित्र कमी आणि शत्रूच जास्त झाले आहेत- गंभीर