भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनचा नुकताच पुन्हा एकदा वूस्टरशायर कौंटी संघाबरोबर करार झाला आहे.
यामुळे अश्विनला इंग्लड विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर कौंटी चॅम्पियनशीपच्या उर्वरित दोन सामन्यांसाठी इंग्लंडमध्ये थांबावे लागणार आहे.
यामध्ये अश्विन एसेक्स विरुद्ध केम्सफोर्ड येथे आणि यॉर्कशायर विरुद्ध ब्लॅकफिंच येथे होणाऱ्या सामन्यांमध्ये वूस्टरशायरकडून सहभागी होणार आहे.
वूस्टरशायर कौंटी संघाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ वर्षीय आर अश्विन विदेशी खेळाडू म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या वॅन पार्नेलची जागा घेईल.
यापूर्वीही अश्विनने वूस्टरशायर संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.२०१७ च्या मोसमात वूस्टरशायरसाठी अश्विनने चमकदार कामगिरी केली होती. ज्यामुळे वूस्टरशायरचा, कौंटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या डिव्हीजन एक मध्ये समावेश झाला होता.
यामध्ये अश्विनने चार सामन्यात दोन वेळा पाच बळी मिळवत २० फलंदाजांना गारद केले होते.
भारत-इंग्लंड यांच्यात १ ऑगस्टपासून पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-माझ्या आयुष्यासाठी सचिन तेंडुलकरला फलंदाजीसाठी निवडेल- राहुल द्रविड
-फलंदाजीत मोठं नाव असलेल्या रुटने गोलंदाजीतही केला कहर