एप्रिलमध्ये गोल्ड कोस्ट येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील महाराष्ट्रातील पदक विजेत्या खेळाडूंसाठी महाराष्ट्र सरकारने बक्षिस जाहीर केले आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये तेजस्वीना सावंत आणि हिना सिध्दू( नेमबाजी), राहुल आवारे(कुस्ती), मधुरीका पाटकर, पूजा सहस्त्रबुद्धे आणि सनिल शेट्टी(टेबल टेनिस) चिराग शेट्टी(बॅडमिंटन) या सात जणांचा समावेश आहे.
या सर्व खेळाडूंनी त्यांच्या खेळप्रकारात सुवर्ण पदक मिळवले आहे. त्यासाठी त्यांना प्रत्येकी पन्नास लाख रूपये बक्षिस देण्यात येणार आहे.
तसेच याव्यतिरीक्त तेजस्वीनी सावंत, हिना सिध्दू यांनी या स्पर्धेत सुवर्ण पदकासोबतच रजत पदकही मिळवले आहे. तर चिराग शेट्टीने सुवर्ण आणि कास्य पदक मिळवले आहे.
त्यासाठी तेजस्वीनी सावंत आणि हिना सिध्दू यांना वेगळे तीस लाख रूपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. तर चिराग शेट्टीला कास्य पदकासाठी वेगळे २० लाख रुपये मिळतील.
तेजस्वीनी सावंतने ५० मिटर रायफल ३पी प्रकारात सुवर्ण तर ५० मिटर रायफल प्रोन प्रकारात रजत पदक मिळवले आहे.
हिना सिध्दूने २५ मिटर पिस्टल शुटिंगमध्ये सुवर्ण आणि १० मिटर एअर पिस्टल प्रकारात रजत पदक प्राप्त केले आहे.
चिराग शेट्टीने बॅडमिंटनमध्ये पुरूष दुहेरीत रजत तर मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक मिळवले आहे.
टेबल टेनिसमध्ये सनिल शेट्टीने पुरषांच्या सांघिक प्रकारात सुवर्ण तर पुरूष दुहेरीत कास्य पदक मिळवले आहे. त्याला सुवर्ण पदकासाठी ५० लाख तर कास्य पदकासाठी २० लाख रुपये मिळणार आहेत.
तसेच कुस्तीमध्ये राहुल आवारेने ५७ किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवले आहे.