जगप्रसिद्ध असलेल्या आयपीएलचा 13 वा हंगाम 19 सप्टेंबर पासून यूएईमध्ये सुरु होणार आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये खेळला जाईल. आयपीएलच्या इतिहासावर नजर टाकली तर 2016 आणि 2017 साली राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांना बेकायदेशीर सट्टेबाजी प्रकरणामुळे निलंबित करण्यात आले होते. या हंगामात खबरदारी म्हणून बीसीसीआयने कडक पाऊल उचलले आहे.
स्पोर्टरडार ही एक खाजगी बहुराष्ट्रीय कंपनी क्रीडा क्षेत्रातील डेटा एकत्रित करते आणि त्याचे विश्लेषण करते. सट्टेबाजीशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी बीसीसीआय स्पोर्टरडारची मदत घेणार आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, “करारानुसार आयपीएल 2020 मधील सर्व सामन्यांचे स्पोर्टरडार या कंपनीकडून निरीक्षण केले जाईल जेणेकरून सट्टेबाजीबद्दल माहिती मिळू शकेल. स्पोर्टरडार सामन्यांचे मूल्यांकन करेल व सर्व डेटा बीसीसीआयला देईल. गरज पडल्यास त्यांच्या गुप्तचर व तपासणी सेवाही बीसीसीआय वापरु शकतील.”