वर्सेस्टर | भारत अ विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यातील एकमेव अनाधिकृत कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकने दमदार शतक झळकावले.
यामध्ये अॅलिस्टर कुकने २२ चौकारांसह नाबाद १५४ धावा केल्या आहेत.
अॅलिस्टर कुकच्या शतकाच्या जोरावर वर्सेस्टर येथिल कौंटी क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या अनाधिकृत कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंड लायन्सने २ बाद ३१० धावा केल्या आहेत.
या शतकामुळे कुकला १ अॉगस्टपासून भारता विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी चांगली लय मिळली आहे. अॅलिस्टर कुकचा हा फॉर्म भारतीय संघाला पुढे कसोटी मालिकेत डोकेदुखी ठरु शकतो.
इंग्लड लायन्सचा कर्णधार रॉनी बर्न्सने नानेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
रॉनी बर्न्स (५) वगळता अॅलिस्टर कुक नाबाद (१५४), निक गबिन्स (७३) आणि डेव्हीड मालन नाबाद (५९) धावा यांच्या जिवावर इंग्लंड लायन्सने पहिल्या दिवशी २ बाद ३१० धावांचा डोंगर उभारला.
भारतीय अ संघाची गोलंदाजी पहिल्या दिवशी पूर्णपणे निष्प्रभ ठरली. अंकित राजपूत आणि नवदीप सैनी यांनी प्रत्येकी एक बळी मिळवले. हे दोन गोलंदाज वगळता एकाही गोलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.
भारतीय संघ व्यवस्थापनाने या कसोटी सामन्यात सलामीवीर मुरली विजय आणि मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणेला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सराव व्हावा म्हणुन संधी देण्यात आली आहे.
तर इंग्लंडनेही इंग्लंडच्या कसोटी संघाचे नियमित सदस्य असलेल्या माजी कर्णधार अॅलिस्टर कुक आणि डेव्हीड मालन या खेळाडूंना अनाधिकृत कसोटी सामन्यात संधी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-म्हणून जोकोविचच्या मुलाला पाहाता आली नाही विंबल्डनची फायनल!
-लंडनमधील भुयारी रेल्वेस्थानकाला इंग्लंड फुटबॉल संघाच्या मॅनेजरचे नाव