अॅंटीगा | विंडीजमधील सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर बुधवार, ४ जुलैला सुरू झालेल्या विंडीज-बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात विंडीजने बांगलादेशला पहिल्या डावात १८.४ षटकात ४३ धावांवर बाद केले.
१४१ वर्षाच्या कसोटी क्रिकेट इतिहासातील हा दुसरा सर्वात छोटा डाव आहे. या डावात बांगलादेशने १८.४ षटके (११२ चेंडू) खेळत सर्वबाद ४३ धावा केल्या.
२०१५ साली इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला १८.३ षटकात (१११ चेंडू) ६० धावांवर सर्वबाद केले होते. हा डाव कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात छोटा डाव होता.
१९७४मध्ये लाॅर्ड कसोटी सामन्यात भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ४२ धावांवर बाद झाला होता. त्यानंतर ही कसोटी क्रिकेटमधील सर्वात निचांकी धावसंख्या आहे.
विंंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीजनेचा निर्णय घेतला. विंडीजच्या गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत बांगलादेशच्या फलंदाजीला अक्षरश: सुरूंग लावला.
विंडीजचा गोलंदाज किमोर रोचच्या माऱ्यापुढे बांगलादेशचा निम्मा संघ गारद झाला. रोचने ५ षटकात ८ धावा देत ५ बळी मिळवले. तर मिगेल कमिन्संने ३ आणि कर्णधार जेसन होल्डरने दोन गडी बाद केले.
बांगलादेशच्या या डावात लिट्टन दास ने सर्वाधिक २५ धावा केल्या. तो वगळता बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विंडीजने २ गडी गमावून २०१ धावा करत १५८ धावांची आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-Video: जेव्हा नेहमीच शांत असणारा भुवनेश्वर कुमार चिडतो!
-केवळ २० धावा करणाऱ्या कोहलीने साजरी केली विक्रमांची दिवाळी